सोलापूर : सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत बेकरी, दूध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकाने, खाद्यपदार्थ, मेडिकल यासारखे अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण आणि शहरी भागात सर्व दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद राहतील.
उद्या मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत.
महाविकास आघाडीचे दळभद्री व पांढऱ्या पायाचे सरकार त्यांच्यामुळेच कोरोना आला, राज्यातील परिवर्तनाला सुरुवात पंढरपुरातूनhttps://t.co/6lSBM4ZfzM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
तसेच शनिवारी-रविवारी पूर्णता बंद राहील. उर्वरित कालावधीमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि पुढे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वैद्य करण्याशिवाय किंवा परवानगीशिवाय संचार करण्यास बंदी राहील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले, त्यांची झाली गृहमंत्रीपदी वर्णी, अजित पवार, हसन मुश्रीफ यांची पॉवर वाढणार https://t.co/bwZSIkHC4q
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
या काळात उद्योगांना मुभा देण्यात आली आहे. उद्योजकांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून उद्योग सुरू ठेवता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी रात्री काढले आहे.
अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुन्हा 'देऊळबंद', प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिर बंद करण्याचा निर्णयhttps://t.co/GUZKWIrFhs
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
बेकरी, दुध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकान, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल स्टोअर हे सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हाॅटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रूग्णालय, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा दुकानं बंद राहणार आहेत.