मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळी नूतन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली.
हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते – दिया मिर्झा https://t.co/mtYEBBt0sn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं ते म्हणाले. तसेच उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला आहे. त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, उदयनराजे भोसले याठिकाणी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर लवकरच आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सध्या शरद पवार सिल्व्हर ओकवर आराम करत आहेत.
दरम्यांन परमबीर सिंग यांच्या पत्रासंदर्भात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आरोप दिल्यानंतर शरद पवार घरातूनच का होईन पण पुन्हा सक्रिय झाले आहेत. कालच अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना भेटायला आले होते. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपादचा राजीनामा सोपवला होता.
कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश https://t.co/tpFPeQSo5V
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
तसेच आता महाविकासाघाडी सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज सकाळपासून पुन्हा सिल्व्हर ओकवरील घडामोडींना वेग आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळापूर्वीच याठिकाणी आले होते. ते आता सिल्व्हर ओकवरून बाहेर पडले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.