बार्शी : येथील तंत्रनिकेतन विद्यालयातील कोरोना रुग्णांच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल उमेश भागवत कोंढारे (वय ३७ ) रा. चिखर्डे ता. बार्शी या रुग्णाने गळफास घेवुन आत्महत्या केली.
अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुन्हा 'देऊळबंद', प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिर बंद करण्याचा निर्णयhttps://t.co/GUZKWIrFhs
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
उमेशचे सर्व कुटुंबच या केंद्रामध्ये दाखल आहे. रात्री कुटुंबियांशी, शेजारील रुग्णांशी, कर्मचाऱ्यांशी हसतमुख गप्पा मारुन झोपायला गेलेल्या उमेशने फाशी घेतल्याचे पहाटे लक्षात आल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या सहा दिवसापासून उमेश या केंद्रात उपचार घेत होता. त्याची प्रकृती ठणठणीत होती. त्याला लवकरच डिसचार्ज मिळणार होता. सेंटरमधील स्वच्छतागृहात त्याने पत्नीच्या साडीने गळफास घेतला. त्याला दोन भाऊ, आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. या घटनेमुळे कोरोना सेंटरमधील व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सहसंपादक रमेश महामुनी यांचे निधन #surajyadigital #सुराज्यडिजिटल #solapur #सोलापूर #निधन
पुणे : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ,संचारचे सहसंपादक रमेश महामुनी यांचे रात्री १.३० वाजता कोरोनाने पुणे येथे निधन झाले pic.twitter.com/rza1z0sCq2— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021