पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. सभेदरम्यान प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमली होती. यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता. अजित पवारांचा हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला होता. याप्रकरणी शिंदे यांच्यावर कलम 188 नुसार पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
खोटे कोरोना रिपोर्ट तयार करणा-या पंढरपुरातील पॅथॉलॉजीवर कारवाई https://t.co/t5wgxuhteH
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. या सभेदरम्यान प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमली होती. यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता. याप्रकरणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकी रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येनं पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमाला फक्त 200 लोकांची परवानगी होती. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. यातील अनेक जण मास्क न घालताच पाहायला मिळत होते. यावेळी कोरोना निर्बंधांना हरताळ फासण्यात आला.
अजित पवारांचा हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला होता. यामुळे त्यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188 नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.