पंढरपूर : खोटे कोरोना तपासणी अहवाल तयार करणाऱ्या वात्सल्य पॅथॉलॉजीवर कारवाई करत काल गुरुवारी सील करण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. यावेळी वात्सल्य लॅब चालवनारा आदमिले यास अवैध रिपोर्ट तयार करताना आणि रॅपिड अँटिजेंन टेस्ट किटसहीत रंगेहात पकडण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुढील चार – पाच दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा https://t.co/jc0WlXgi3z
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
कोविड तालुका कृति समिती मार्फत पंढरपूर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन खोटे रिपोर्ट वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले, नायब तहसीलदार कोळी, पोलिस उपनिरीक्षक शमगदूम यांच्या पथकाने अचानक धाड टाकली.
किट पूरवणारा तसेच बोगस रिपोर्ट तयार करुन देणारा उमेश शिंगटे यालाही पकडण्यात आले आहे. आदमिले व उमेश शिंगटे या दोघांनी हे काम गेल्या २-३ महिन्यांपासून करत असल्याची कबुली दिली. यावरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुह्यात आणखी काहीजण आहेत का याची चौकशी सुरू आहे.