मुंबई : अपूर्वा नेमळेकर ही ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता ही व्यक्तिरेखा साकारुन रातोरात प्रकाशझोतात आली. एखाद्या नामांकित कलाकाराला लाजवेल इतकं तिचं फॅन फॉलोइंग आहे. याचं श्रेय तिनं एका स्त्रीला दिलंय. या स्त्रीमुळं अपूर्वाचं आयुष्य रातोरात बदललं. तिनं इन्स्टाग्राम पोस्ट करुन त्या स्त्रीचं नाव सांगितलं आहे. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द शेवंताच आहे. यासाठी तिनं शेवंताचे आभार मानले आहेत.
छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’चे तिसरे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच सगळ्या कलाकारांची अर्थात त्यांच्या पात्रांची एंट्री झाली होती. मात्र, प्रेक्षक वाट बघत होते ती त्यांच्या लाडक्या ‘शेवंता’ची! अखेर प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता आता या मालिकेत भुताच्या रूपाने का होईना पण अण्णांसोबत ‘शेवंता’ची देखील एंट्री झाली आहे. नुकताच एक खास फोटो शेअर करत अपूर्वाने देखील तिचे आभार मानले आहेत.
एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलली https://t.co/jthP3aIpuM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘धीस लेडी चेंज माय लाईफ’ अर्थात ‘या स्त्रीने माझे आयुष्य बदलले’, असे म्हणत ‘शेवंता’ साकारणाऱ्या अपूर्वाने तिच्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला या यशाचे श्रेय देऊ केले आहे. बरं ही खास व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून खुद्द ‘शेवंता’ आहे.
Mind-blowing Angel #ApurvaNemlekar 😍#ActressesDuniya pic.twitter.com/38xHbcj4pR
— . (@actressesduniya) December 20, 2020
22 फेब्रुवारी 2016 मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता!
* तिसऱ्या पर्वाकडून वाढल्या अपेक्षा
सुरुवातीला कोकणची बदनामी होते म्हणून मालिकेला विरोध झाला. पण जसजसे कथानक पुढे सरकत गेले, तसतसा हा विरोधही मावळत गेला. पहिल्या पर्वामध्ये पहिल्याच भागात अण्णा गेले, असे दाखवले आणि कथानक पुढे नेले होते. पण दुसऱ्या पर्वामध्ये मात्र अण्णांचा पूर्ण जीवनपटच दाखवला होता. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच लोकांनी कार्यक्रमाला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आत तिसऱ्या पर्वाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.