मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यासह देशात १६ जानेवारीला प्रारंभ झाला. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने 1 कोटींचा टप्पा पार केला आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे. दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय – सरकारने रेमडेसिव्हीरची निर्यात थांबवली https://t.co/XFLJH3YabF
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून, आज रविवारी राज्याने त्यात विक्रमी नोंद केली आहे. आतापर्यंत राज्यात १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत आणखी वाढ होईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलेले आहे.
मुळात कोरोना हा रोग नाही, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला, मूर्खपणा आहे – संभाजी भिडे https://t.co/AXb8Q5WVTd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून मागील काही दिवसांत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त, राज्य सरकार वसुलीत व्यस्त, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले महाराष्ट्र सरकारवर आरोप #maharashtra #central #government #सुराज्यडिजिटल #surajyadigital pic.twitter.com/GMXLomK6m8
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
केंद्राकडून लस वितरणात राजकारण होत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला गेला. तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले. लस वाटपावरून पेटलेल्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भूमिका मांडली आहे.