सोलापूर : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरातील कोरोनाबाधितासाठी 75 रेमडेसिविर इंजेक्शन देउन मदत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी हि माहिती दिली. सोलापुरात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती, विनम्र अभिवादन #surajyadigital #अभिवादन #सुराज्यडिजिटल #महात्मा #जोतिबाफुले pic.twitter.com/6QRrQK0vzz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी गरीबांना दिवस दिवसभर पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सोलापूरसाठी 75 रेमडेसिविर इंजेक्शन पाठवून दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन देण्यात आले. सोलापूर शहरातील गरीब आणि गरजू नागरीकांना हे इंजेक्शन देण्यात येणार आहेत. सध्या या इंजेक्शनच्या देखरेखेसाठी जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन केली आहे, त्या समितीकडे हे इंजेक्शन देणार असल्याची माहिती महेश गादेकर यांनी केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा रूग्णालयात दाखल
https://t.co/piKJ7hVsdG— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
या अगोदरही गेल्या वर्षी पवार यांनी सोलापूरकरांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन पाठवून दिले होते. शरद पवारांचे सोलापूरवर विषेश प्रेम आहे. सोलापुुरात प्रत्येक घडामोडीवर शरद पवार यांचे लक्ष असते. दुष्काळ असो अथवा इतर आपत्ती. सोलापूरला मदत मिळवून देण्यासाठी पवार हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आताही सोलापूरकरांच्या मदतीला पवार धावून आल्याचे सांगितले जात आहे.