नवी दिल्ली : कोरोनावरील आणखी एक लस भारतात लवकरच उपलब्ध होणार आहे. रशियाच्या स्पुतनिक-व्ही या लशीच्या आपातकालीन वापरासाठी सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने (SEC) मंजुरी दिल्याचे वृत्त आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डी यांनी यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे आज याला सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोनावरील 2 लशींना परवानगी आहे.
पत्नीला झुरळांची भीती वाटते म्हणून पतीने मागितला घटस्फोट https://t.co/fagnRDcoJ0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
भारतात हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ.रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुतनिक व्ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे. या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. भारतात सध्या ऑक्सफोर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाच्या मदतीने तयार करण्यात आलेली पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि हैदराबादमधील भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
1 एप्रिलला रशियाच्या कोरोना लशीला परवानगी नाकारण्यात आली होती. या लशीबाबत आणखी माहिती देण्याची मागणी भारतीय औषध महानियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञ समितीने डॉ. रेड्डीज लॅबकडे केली होती. आता अखेर या लशीला परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांना कोरोनाची लागण #corona #surajyadigital #लागण #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/rW0sc9I7oc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
ही लस Coronavirus विरोधात 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे. रशियाने सर्वात प्रथम या लशीला मंजुरी दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ही लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. या लशीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर 28 ते 42 व्या दिवसांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होते. भारतात आतापर्यंत या लसीच्या 1 हजार 500 जणांवर चाचण्या झाल्या आहेत.