सोलापूर : महाराष्ट्रात ( 14 एप्रिल) रात्री 8 वाजतापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी नाकाबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून येत आहे. सोलापुरात सर्व ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर सोलापुरातील रस्त्यांवरही गर्दी पाहायला मिळत नाहीय. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद आहेत. विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.
अवकाळी पावसाची हजेरी, बळीराजाच्या संकटात आणखी भर https://t.co/pnuqp1YetE
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्याने 15 दिवस कडक संचारबंदी लागू केली आहे. नव्या निर्बंधानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रात्री उशिरा आदेश काढले आहेत.
होम डिलेव्हरी व पार्सल सेवेला काही प्रमाणात सूट दिली आहे. महापालिका हद्दीतील बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला रात्री दहापर्यंत होम डिलेव्हरी आणि पार्सल सेवेच्या अनुषंगाने परवानगी दिली आहे. ऑर्डर देण्याच्या उद्देशाने किंवा ऑर्डर घेऊन जाण्याच्या उद्देशाने कोणीही भेट देऊ नये, असे आदेशातून स्पष्ट केले आहे. तर रूग्णांची सेवा करणाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रशासनाने सांगितलेले हेल्पलाइन नंबर, पोलीस, आरोग्य, सिव्हिल हॉस्पिटल, महानगरपालिका, दवाखाने, नजीकचे पोलीस ठाणे सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा. त्यामुळे मनामध्ये काही शंका आली तर फोनवरून तिथे शंकानिरसन करू शकता, असे प्रशासनाच्यावतीने सांगितले जात आहे.
कारखाने आणि उद्योगातील एखादा कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यास त्यांच्या संपर्कातील सर्व कामगारांचे अलगीकरण कारखाना प्रशासनाला स्वखर्चाने करावे लागणार आहे. पाचशेपेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखाना किंवा उद्योगाच्या ठिकाणी स्वतःचेअलगीकरण केंद्र स्थापन करावे लागणार आहे. एखादा कामगार कोरोनाबाधित आल्यास हा कारखाना किंवा युनिट पूर्ण निर्जंतुक होईपर्यंत बंद ठेवले जाणार आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनकरिता चिठ्ठी घेऊन फिरु नका, थेट रुग्णालयातच मिळणार https://t.co/i2xYpfqZIr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार हे एकत्रित बसून सेवा देण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. होम डिलिव्हरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याची सूचनाही या आदेशात करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हर व दोन प्रवासी, टॅक्सी किंवा चार चाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व वाहनाच्या 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक, बस वाहतुकीसाठी आरटीओने दिलेल्या पासिंगनुसार पूर्ण क्षमतेने वाहतुकीस परवानगी दिली आहे.
* असे आहेत कडक निर्बंध
चारचाकी आणि टॅक्सी वाहनांत जर कोणत्याही एका व्यक्तीने मास्क घातला नसेल तर त्या टॅक्सी चालकाला व मास्क न घालणारे व्यक्तीला प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. रस्त्याच्या कडेच्या खाद्य विक्रेत्यांनी रस्त्याच्या ठिकाणी ग्राहकांना खाद्यपदार्थ खाण्यास देऊ नये. ग्रामीण भागासाठी फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत तर महापालिका हद्दीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत सर्व दिवशी देता येणार आहे.
अनिल देशमुखांची साडेआठ तास सीबीआयकडून चौकशी
https://t.co/zbLasJFo1o— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
या कालावधीत सिनेमा हॉल, नाट्यग्रह, सभाग्रह, मनोरंजन पार्क, व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, चित्रपट आणि सिरियल आणि जाहिरातीचे चित्रीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. धार्मिक स्थळांमध्ये दैनंदिन नित्य उपचार सुरु राहतील, परंतु बाहेरील व्यक्तींना मनाई असणार आहे. शाळा व महाविद्यालय बंद राहणार असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. केश कर्तनालय, स्पा, सलून व ब्युटी पार्लर ही दुकाने बंद राहणार आहेत.
* प्रमाणपत्र आवश्यक, अन्यथा भुर्दंड
विवाह स्थळ, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचे अभ्यंगतांचे लसीकरण अथवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. लसीकरण अथवा कोरोना निगेटीव्हचे प्रमाणपत्र नसल्यास अशा व्यक्तीला एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. विवाहस्थळ अस्थापनांना दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. लग्नासाठी जास्तीत जास्त 25 जणांना तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.