सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. देशात कोरोना पसरलाय, मात्र यावर उपाययोजना नाही. लहानपणी आई सांगायची घरात भांडी वाजवली तर दारिद्र्य येतं. प्रचारजीवी मोदी महाराजांनी जनता कर्फ्यूच्या नावाखाली थाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यानंतर दिवे लावण्याचा उद्योग केला. असं पटोले म्हणाले. तसेच फडणवीसांवरही पटोलेंनी टीका केली.
ही भाषा बरोबर नाही, अजित पवारांवर एम फिल कराव लागेल #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल #bjp #ncp #पंढरपूर #निवडणूकhttps://t.co/v9nExInoWW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी आज नाना पटोले पंढरपुरात आले होते. यावेळी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे , उमेदवार भगीरथ भालके , डॉ धवलसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्वाची बातमी! एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही https://t.co/ZcUh4u39Sm
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
केंद्राने सगळ्या नागरिकांचे वेळीच लसीकरण केले असते. तर आज देशांत ही कोरोनाचा संसर्ग वाढला नसता. केंद्र सरकारवरच सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहे. देशातले नागरिक सोडून पाकिस्तानला लस देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाक धार्जिणे असल्याचा आरोप पटोले यांनी केला. पेट्रोल मधून रस्ते विकासासाठी प्रती लिटर 14 रुपये व शेतकरी विकासासाठी 5 रुपये कपात करणारे मोदी सरकार देशाला विकत असून आता तर देश विकायला काढल्याचा आरोप केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लॉकडाऊन करताना जे घटक मदतीपासून सुटलेले आहेत. अशा घटकांना पण मदत करा असे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
'मला चंपा म्हणणं थांबले नाही तर…' चंद्रकांत पाटलांचा पवारांना इशारा https://t.co/Qub40hHEzc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील पटोली यांनी एकेरी टीका केली. देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहे. फडणवीस जरी काही बोलत असेल तरी तेच ओबीसी विरोधी आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. त्यांच्या मुळेच ओबीसी समाजच नुकसान झाले आहे.
मे महिन्यात 'या' तारखेनंतर राज्यातील सत्तेला सुरुंग – चंद्रकांत पाटील https://t.co/DCgc1TpVZc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
* राजू शेट्टी सध्या डबल ढोलकी
राजू शेट्टी सरकारवर टीका करत असले तरी ते डबल ढोलकी आहेत असा टोला त्यांनी शेट्टी यांना लगावला. आज न्यायालये देखील महाराष्ट्रासारखे काम करण्याच्या सूचना भाजपशासित काही राज्यांना देत असल्याचे सांगत कोरोनाचे काम ठाकरे सरकार चांगल्या रीतीने करीत आहे . रेमडिसीवीर इंजेक्शन आणि लसी राज्याला देत नसल्याचां टोला पटोले यांनी लगावला.