सोलापूर : सोलापुरात पोलिसाने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून तसेच गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. पतीने तिला दोन दिवस भाजलेल्या अवस्थेत घरातच कोंडून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
नातेवाईकांच्या मदतीने सुटका केल्यानंतर उपचारासाठी ती सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल झाली आहे. प्रीती दत्तात्रय बन्ने (वय 32, रा. विष्णुपुरी, जुळे सोलापूर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. पती दत्तात्रय बन्ने हा पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे.
संचारबंदी लागू अनेक रस्त्यांवर शुकशुकाट, सोलापुरात अशी आहे नियमावली https://t.co/YhvxUD1kPF
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
याबाबत प्रीतीने दिलेली माहिती अशी, पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय बन्ने याचा विवाह सन 2003 मध्ये प्रीती हिच्याबरोबर झाला होता. सध्या त्यांना दोन मुलेे आहेत. पण याच दरम्यान दत्तात्रय बन्ने याचे एका महिला पोलिस कर्मचार्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हे प्रेमसंबंध असल्याचे प्रिती हिने सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबलची बदली मुंबईमध्ये झाल्यानंतरही हे प्रेमसंबंध सुरूच होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्या महिला पोलिस कॉन्स्टेबलची बदली सोलापूर पोलिस आयुक्तालयात झाली आहे. त्यामुळे ते दोघे पुन्हा दररोज भेटत आहेत. त्यामुळे दत्तात्रय बन्ने याची घरात प्रिती व दोन्ही मुलांबरोबर नीट वागत नसल्याची प्रितीची तक्रार आहे. बन्ने हे प्रितीला दररोज शिवीगाळ, मारहाण करणे, तिचे सोन्याचे दागिने विकून आलेले पैसे संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबलवर उधळत असल्याची प्रितीची तक्रार आहे. दरम्यान, संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबलने दत्तात्रय याच्या मागे पहिल्या पत्नीस सोडचिठ्ठी देऊन तिच्याशी विवाह करण्याचा तगादा लावला. तेव्हापासून दत्तात्रय याने प्रितीला शिवीगाळ व मारहाण करू लागल्याचे प्रितीचे म्हणणे आहे.
मे महिन्यात 'या' तारखेनंतर राज्यातील सत्तेला सुरुंग – चंद्रकांत पाटील https://t.co/DCgc1TpVZc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
प्रिती बन्ने हिचे बंधू आप्पाशा पुजारी (गावडे) म्हणाले, एका महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या नादाला लागून दत्तात्रय बन्ने याने बहिणीला माहेरून पैसे आण म्हणून तिचा शारिरीक छळ केला. तिच्या अंगावरील सोने विकले. आता पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत, असे सांगितले.
* भाजलेल्या अवस्थेतही दोन दिवस बंदिस्त
दत्तात्रय बन्ने याचे गेल्या सोमवारी (ता. 12) प्रिती हिच्याबरोबर भांडण झाले. त्यावेळी त्याने प्रितीला मारहाण केली तसेच तिच्या उजव्या खांद्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्याबरोबरच तिचा गळा दाबून तिला घरातच कोंडून ठेवले, अशी प्रितीची तक्रार आहे. भाजलेल्या अवस्थेतही प्रिती दोन दिवस बंदिस्त अवस्थेत होती. तिने फोन करून स्वत:च्या आईला ही हकीकत सांगितली. तेव्हा बुधवारी (ता. 14) प्रितीची आई सोलापुरात आली. तिने तिची सुटका करीत उचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिव्हिल पोलिसात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.