पुणे : कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. ससून रुग्णालयात तीन दिवसांपासून रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.पुण्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रेमडेसिवीर औषध मिळत नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या https://t.co/Utbk7Zt2H8
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे. दरम्यान, संचारबंदी असतांना नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. आता रेमडेसिवीर औषध उपलब्ध करुन देण्यात येईल की आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार याकडे लक्ष आहे. जर कारवाई केली तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रेमडेसिवीर औषध मिळत नसल्याने ठिय्या आंदोलन करणाऱ्यांनी काही वेळापूर्वी रस्ता रोकोही केला. संतप्त नातेवाईकांनी रस्त्यातच बसत निषेध केला. रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्यानं रेमडेसिवीर औषध मिळत नाही, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ससून रुग्णालयात तीन दिवसांपासून रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त आहेत.
* कोरोनाग्रस्त तीन लाख पार
पुण्यात काल दिवसभरात 4 हजार 206 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या चिंताजनक आहे. दरम्यान बाधितांच्या तुलनेत एका दिवसात 4 हजार 895 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज #sharadpawar #शरदपवार #discharge #डिस्चार्ज #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/vPyd3yIViv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
ही संख्या एकट्या पुणे शहरातील आहे. पुण्यात काल 66 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 66 पैकी 20 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरील नागरिक आहेत. पुण्यात सध्या 1 हजार 158 कोरोनाबाधित हे क्रिटिकल रुग्ण आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही 3 लाख 44029 आहे.