सातारा : जिल्ह्यात बावधनच्या बगाड यात्रेला लोकांनी अफाट गर्दी केली होती. त्यानंतर आतापर्यंत 134 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बावधन गावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. विशेष म्हणजे बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपनिरिक्षक यांनाही कोरोना झाल्याचे समोर आलं होतं.
गुडन्यूज – देशात यंदा चांगला पाऊस बरसणार, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस https://t.co/RwXRtPIapT
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
सातारा जिल्ह्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यात्रा झाल्यापासून गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर आता यात वाढ झाली आहे. आता 134 जणांना लागण झाली आहे.वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बगाड यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी 83 जणांवर अटकेची कारवाई देखील केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
83 जणांना अटक आणि जामीनबावधन बगाड यात्रा भरवल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अडीच हजार बावधनकरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होती. यातील 83 जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना वाई न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच हजार रुपयांच्या अनामत रकमेवर जामीन दिला.
अवघ्या ३८ तासात पंढरपुरात उभे राहिले 'कोवीड ऑक्सिजन' हाॅस्पिटल https://t.co/PiDRQK4ouV
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
राज्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना यात सातारा जिल्हा देखील मागे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बावधनच्या बगाड यात्रेच्या आयोजनावर बंदी घातली होती. बावधनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी आणि यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलं होतं. परंतु प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत बावधनची बगाड यात्रा 2 एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली होती.