सोलापूर : संगमेश्वर महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आणि अनेक दैनिकांमध्ये काम करणाऱ्या प्रकाश जाधव या युवा पत्रकाराने डाव्या हाताची नस कापून राहत्या घरीच आत्महत्या केलीय.
सोलापुरातील नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत स्टेजवर होती उपस्थिती https://t.co/Vaefx06LGz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
प्रकाश धर्मा जाधव (वय 35, रा. सुशीलनगर, जुळे सोलापूर) असे त्या पत्रकाराचे नाव आहे. त्यांनी दैनिक सुराज्यसह अनेक दैनिकात काम केले होते. त्यांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र पित्याच्या मृत्यूने खचलेल्या मुलाने स्वतःचीच जीवनयात्रा त्या अगोदरच संपवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रकाशची आई आणि वहिनी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांच्यावर ही सोलापुरातील हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु आहेत. घरातील साऱ्याच व्यक्तींना कोरोनाची लागणं झाल्याने प्रकाश आणि भाऊ सतीश हे दोघंही विलगीकरणात राहत होते.
मात्र मानसिक मनोबल खचलेल्या प्रकाशने टोकाचं पाऊल उचलून स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. प्रकाश याने डाव्या हाताची नस कापल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
मुंबईत कोरोना लस बनवण्यास मंजुरी, सीएमने मानले पीएमचे आभार https://t.co/ZREXMLtLAk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
त्याचा भाऊ सतीश जाधव हा सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे. प्रकाश जाधव सारख्या हरहुन्नरी युवा पत्रकाराने आत्महत्या केल्याने सोलापुरातील पत्रकारांमधून हळहळ व्यक्त केली जातं आहे.