सोलापूर : सोलापूर जिल्ह्याने आतापर्यंतचे कोरोनाने मृत्यूचे रेकॉर्डब्रेक केले. दिवसभरात शहर व जिल्ह्यात एकूण 30 जणांचे बळी गेले. यामध्ये शहरातील 14 तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 16 अशा 30 जणांचा समोवश आहे. गुरुवारी सोलापुरात कोरोना बळीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत एका दिवसात 29 जणांचा बळी गेला होता. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. दिवसात नव्याने 1 हजार 73 रुग्णांची भर पडली आहे.तर 1 हजार 2 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आणखी 386 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
मुंबईत कोरोना लस बनवण्यास मंजुरी, सीएमने मानले पीएमचे आभार https://t.co/ZREXMLtLAk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
बुधवारी ग्रामीण भागातील 5 हजार 102 जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 4 हजार 385 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 717 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 453 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. सोलापूर शहरातील 2 हजार 692 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यापैकी 2 हजार 336 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 356 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 548 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 54 हजार 822, तर शहरातील 20 हजार 666, असे एकूण 75 हजार 488 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 1345 तर शहरातील 868, अशा एकूण 2213 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागापैकी 6 हजार 252, तर शहरातील 3 हजार 565, अशा एकूण 9 हजार 817 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 47 हजार 225, तर शहरातील 16 हजार 233, असे एकूण 63 हजार 458 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सोलापुरातील नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत स्टेजवर होती उपस्थिती https://t.co/Vaefx06LGz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
* शहरात 14 तर ग्रामीणमध्ये 16 बळी
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील 69 वर्षीय महिला, महाळुंग येथील येथील 47 वर्षीय पुरुष, माळीनगर येथील 65 वर्षीय पुरुष, आणि 72 वर्षीय पुरुष, मंगळवेढा तालुक्यातील नागणेगल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, दामाजी नगर येथील 70 वर्षीय महिला, माढा तालुक्यातील भोसरे येथील 68 वर्षीय व 50 वर्षीय पुरुष, कुर्डूवाडी येथील दोन 50 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील 65 वर्षीय पुरुष, नाईकवाडी येथील 82 वर्षीय पुरुष, शेटफळ येथील 60 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर गुंजेगाव येथील 60 वर्षीय महिला, संगदरी येथे 68 वर्षीय पुरुष,
घरातील साऱ्यांनाच कोरोना; सोलापुरातील युवा पत्रकाराची आत्महत्या https://t.co/abXiRouWPS
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
जुळे सोलापूर येथील 71 वर्षीय महिला, कल्याण नगर येथील 65 वर्षांच्या महिला, विश्वकर्ण पार्क येथील 55 वर्षाचे पुरुष, अक्षय सोसायटीतील 60 वर्षीय पुरुष, विजापूर नाका झोपडपट्टी क्र. 1 येथील 65 वर्षीय पुरुष, पश्चिम मंगळवार पेठ येथील 88 वर्षीय पुरुष, लक्ष्मी पेठ परिसरातील 66 वर्षीय महिला, अशोक चौक परिसरातील 56 वर्षीय पुरुष, कणिर्र्क नगरातील 66 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 75 वर्षाच्या महिला, मंगळवार पेठेतील 56 वर्षीय पुरुष, शेळगी येथील 85 वर्षाचे पुरुष, विजापूर रोड सुशिल नगरातील 67 वर्षांचे पुरुष, जगदंबा चौक येथील 85 वर्षीय पुरुष यांचा मयतामध्ये समावेश आहे.