नवी दिल्ली : प्रशासनानं कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचे आकडे लपवले आणि आता मृत्यूची आकडेवारीही लपवत आहे. मीडिया अहवालानुसार कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जात असूनही आकडे वेगळे येत आहेत. प्रत्यक्ष आकडा आणि प्रशासनाची आकडेवारी यात मोठी तफावत असली तरी या फोटोमधून समोर येणारं वास्तव हे अत्यंत भयाण आणि काळीज चिरणारं असं आहे. विशेष म्हणजे यासंबंधीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
In Bhopal crematoria, 187 cremated following Covid norms in last 4 days, official records show only 5 deaths! https://t.co/g3itXrH5KI
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) April 14, 2021
देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकच भयावह होत चालला आहे. दररोजच्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. 15 दिवसांत रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण तीनपट झालं. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक असल्याचं मत केद्रानं व्यक्त केलं.
पद्मश्रीप्राप्त, प्रसिद्ध तमिळ अभिनेते विवेक यांचे निधन
https://t.co/Ywp0y4Qr4r— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचं आकडेवारीवरुन दिसतेय. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये यावरुन झुंपलीही. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुले केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वारंवार चिंता व्यक्त केली. कित्येकवेळा महाराष्ट्र आणि पंजाब येथील कोरोना प्रादुर्भावामुळे चिंतेत असल्याचेही राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
After Gujarat, Madhya Pradesh press foregrounds gross underreporting of Covid deaths – with aerial image of funeral pyres
112 bodies cremated under Covid protocol in Bhopal, says Dainik Bhaskar
Official Covid death count is four pic.twitter.com/l3KLUoWqqK
— Supriya Sharma (@sharmasupriya) April 16, 2021
मात्र, आता भाजप प्रशासित राज्यातून भयावह सत्य समोर आलं आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 112 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आला. पण सरकारी आकडेवारीनुसार फक्त 4 जणांची नोंद आहे. दैनिक भास्करनं याबाबतच वृत्त दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भोपाळमधील भदभदा विश्राम घाट येथील फोटो सरकारचा खोटेपणा अन् कोरोनाची भयावह परिस्थिती दाखवतोय. गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घेतलेला हा फोटो अंगावर शहारे आणणारा आहे. यामध्ये एकाचवेळी 40 पेक्षा जास्त कोरोनानं मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भोपाळमधील या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उरली नव्हती, सरणांसाठी लाकडेही नव्हती.
This is in Bhopal, Madhya Pradesh. Yesterday on @aajtak their Health Minister, Shri Sarang was busy celebrating the central government’s work on COVID.
Wish they could be true to their own residents. pic.twitter.com/HFmjDRNAss— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) April 16, 2021
पीटीआयच्या वृत्तानुसार, भोपाळमध्ये विश्रामघाट आणि कब्रिस्तान या दोन ठिकाणी 108 मृतदेहांवर कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र सरकारी आकड्यांनुसार 15 तारखेला कोरोनामुळे केवळ 8 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. असं असेल तर 108 जणांवर कोव्हिड नियमांनुसार अंत्यसंस्कार का करण्यात आले, शिवराजसिंग चौहान सरकार आकड्यांची लपवा-छपवी करत आहे, असा आरोप होत आहे.
अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना तासन् तास वाट पाहावी लागतेय. ही भयावह परिस्थिती आहे, भाजपची सत्ता असलेल्या राज्यात. पण देशासमोर खोटे आकडेवारी देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. सरकारनं लपवलेल्या आकडेवारीमुळे लोंकामध्ये परिस्थितीचं गांभिर्य राहिलं नाही. अन्यथा एकाच दिवशी इतक्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला नसता.
लॉकडाऊनमध्ये देवदूत बनलेल्या सोनू सूदला कोरोनाची लागण
https://t.co/kEW9O4qGzu— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
देशातील काही राज्यांमध्ये गेल्या आठवडाभरात स्थिती अचानक गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश बरोबरच, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांचाही याच समावेश आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील स्मशानभूमीतील देखील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तर दोन दिवसांपूर्वीच लखनऊमध्ये एका स्मशानातील मृतदेहांच्या रांगांचं चित्र समोर आलं होतं. देशभरात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा प्रकोप आता पाहायला मिळत आहे.
या बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता https://t.co/G1VzsNNxXF
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
* पाच दिवसांत 356 जणांवर अंत्यसंस्कार
गुरुवारी भोपाळमध्ये एकाच दिवशी 112 कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भदभदामध्ये 72, सुभाष नगरमध्ये 30 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर झदा कब्रिस्तानमध्ये 10 जणांचं दफन करण्यात आलं. पण भोपाळमध्ये मृत्यूचा सरासरी आकडा चार होता. मागील पाच दिवसांत भोपाळमध्ये 356 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सरकारी आकेवारीनुसार ही संख्या फक्त 21 आहे.