मुंबई : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश झाला आहे. काल शुक्रवारी रात्री पोलिसांनी मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमधून तिघांना अटक केली आहे. हॉटेलच्या 27 व्या मजल्यावर लक्झरी रूम बुक करून क्रिकेट सट्टेबाजी सुरू होती. पोलिसांनी 8 मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबईत मंदिराला कोव्हिड सेंटर बनवलं!, 100 बेडची व्यवस्था #mumbai #temple #kovid #centre #surajyadigital #मंदिर #कोव्हिडसेंटर #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/RDv4uVZX3i
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
आयपीएलचा 14 वा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या दरम्यान मुंबईत आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफ़ाश केला असून यात सट्टेबाजी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. लोअर परळ भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे आरोपी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. नेमक्या त्याच हॉटेलमध्ये आयपीएलची एक टीमसुद्धा थांबल्याची माहिती समोर येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ भागात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टेबाजी सुरू होती. त्याची माहिती एन.एम. जोशी पोलिसांना मिळाली. ही माहिती समजताच पोलिसांनी सापळा रचत या तिन्ही आरोपींना अटक केली.
लग्नाचे आमीष दाखवून ऑर्केस्ट्रामधील नृत्यांगनेवर बलात्कार, गर्भपात https://t.co/WM53UupJsG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली होती. पंचतारांकित हॉटेलच्या 27 व्या मजल्यावर एका महागड्या खोलीमध्ये हा सट्टेबाजीचा प्रकार सुरू होता.
विमानतळांवरील निर्बंधांमुळे प्रवाशांच्या संख्येत घट https://t.co/bRNisGOf6x
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
कारवाईत पोलिसांनी तब्बल आठ मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. असे असले तरी सध्या अटक केलेले आरोपी आणि आयपीएलची टीम हॉटेलमध्ये थांबणे याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.