सोलापूर : सोलापुरात लग्नाचे आमिष दाखवून ऑर्केस्ट्रामधील 23 वर्षीय नृत्यांगनेवर दीड वर्षापासून बलात्कार केल्याप्रकरणी रिक्षा चालक आकाश ओव्हाळ (रा. बाळे, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आर्केस्ट्रामधील पीडित नृत्यांगना ही शहरातील शिवाजीनगर परिसरात राहते.
रेल्वेचा निर्णय ! विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड https://t.co/CIEkBM3yW0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
मार्केटमध्ये ये-जा करताना 2020 मध्ये तिची रिक्षाचालक आकाश याच्याशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले. जानेवारी 2020 मध्ये संबंधित नृत्यांगनेची तब्येत ठिक नसल्याची माहिती त्यांनी आकाश याला दिली. यावेळी आकाश याने मेडिकलमधून गोळी आणि जेवण घेऊन येतो असे सांगितले. पुन्हा आकाश नृत्यांगना राहत असलेल्या रूमवर गेला. त्याने तिला जेवण आणि गोळी दिली. त्यानंतर त्याने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस’ असे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी पीडित नृत्यांगणेने ‘काहीतरी बोलू नकोस’ म्हणत फटकारले. त्यामुळे आकाश तेथून निघून गेला. पुन्हा दोन दिवसांनी त्याने तिला फोन करून आपण मित्र – मैत्रिण सारखे राहू असे म्हटले. त्यानंतर तिला सोबत जेवायला येण्याची विनंती केली. ते दोघे जेवायला गेल्यानंतर त्याने पुन्हा ‘मी तुझ्याबरोबर लग्न करणार असून तुला धोका देणार नाही’ असे सांगितले.
* दोनदा गेले दिवस, केला गर्भपात
मार्च 2020 मध्ये आकाश हा पीडित नृत्यांगणेच्या रूमवर गेला. त्याने तिला पुन्हा विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आकाश हा नेहमी रूमवर जावून लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवत होता. अखेर ऑक्टोबर 2020 मध्ये नृत्यंगणेला आकाशपासून दिवस गेले. ही बाब तिने आकाशला सांगितल्यानंतर त्याने विवाहाअगोदर अपत्य नको असा पवित्रा घेतला. तसेच पोट दुखी कमी होण्याची गोळी असल्याचे सांगून मेडिकलमधून गर्भनिरोधक गोळी आणून दिली.
"महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू” https://t.co/iBOXFoaPqb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
त्यानंतर पुन्हा त्याने तिच्याशी संबंध कायम ठेवले. यातून 6 एप्रिल 2021 रोजी पुन्हा तिला दिवस गेल्याची बाब तिने आकाशला सांगितली. त्यावेळी पुन्हा आकाश याने पुन्हा मेडिकलमधून गर्भनिरोधक गोळी आणून दिली. त्यानंतर त्याने दुसर्या महिलेबरोबर फोनवरून नृत्यगनेशी बोलणे करून दिले. अखेर आकाश हा तिला फसवत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याबद्दल पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आकाशवर गुन्हा दाखल झाला.