नाशिक : नाशिकमधील सिडकोच्या सिंहस्थनगरमधील राहणाऱ्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ९ जण वाढदिवसानिमित्त काल शुक्रवारी सायंकाळी वालदेवी नदी परिसरात फिरण्यास गेले होते. तेव्हा पाण्याजवळ फोटो काढताना तोल जाऊन काही जण पाण्यात पडले. इतरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण पोहता येत नसल्याने हे ६ जण बुडाले. यात ५ मुली आणि १ मुलगा आहे. दरम्यान, पोलिसांना एका मुलीचा मृतदेह सापडला असून अद्याप शोधकार्य सुरु आहे.
लग्नाचे आमीष दाखवून ऑर्केस्ट्रामधील नृत्यांगनेवर बलात्कार, गर्भपात https://t.co/WM53UupJsG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
कोरोनामुळे होणारे मृत्यूचा आकडा कमी होत नसताना नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या ९ मुला-मुलींपैकी ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
रेल्वेचा निर्णय ! विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड https://t.co/CIEkBM3yW0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी सर्व ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. पाण्यात उभं राहून फोटो काढताना पाय घसरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये सर्वत्र हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे सोनी गमे (वय १२ वर्षे) या आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे मित्रमैत्रिणी थेट वालदेवी धरण परिसरात गेले. त्यांनी सोबत केक देखील नेला होता. मात्र, यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात त्यापैकी एकाचा पाय घसरला.
पंढरपूर पोटनिवडणूक : दिवसभरात ६४ टक्के मतदानाची नोंद https://t.co/S0HTYFioVk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
त्याला वाचवण्यासाठी इतरांनीही पाण्यात उड्या टाकल्या. यामध्ये आरती भालेराव (वय २२), हिम्मत चौधरी (१६), नाजिया मनियार (१९), खुशी मणियार (१०), ज्योती गमे (१६) आणि सोनी गमे (१२) या सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले समाधान वाकळे, प्रदीप जाधव राहणार सिंहस्थनगर आणि सना नजीर मणियार राहणार पाथर्डी फाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले.