नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचारसभा सुरू आहेत. या सभांना हजारोंची गर्दी होत आहे. त्यामुळे राज्यात कोरोना झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत अशा सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा, असं आवाहन त्यांनी केले आहे.
सोलापुरातून पुरवला जातोय रेमडेसिवीरसाठी कच्चा माल https://t.co/oDbk44neXB
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
देशात कोरोनाचा कहर वाढला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व राजकारण्यांसमोर आदर्श ठेवत आपण कोरोना काळा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं असून त्यांनी या ट्वीटमध्ये कोरोनाचं संकट पाहता, मी पश्चिम बंगालच्या सर्व सभा रद्द करत आहे. राजकीय पक्षांनी विचार करायला हवा की, या प्रचार सभेतून जनतेला आणि देशाला किती धोका आहे. राहुल गांधी यांच्या निर्णयाचं नेटिझन्सनी कौतुक केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोविड संकट को देखते हुए, मैंने पश्चिम बंगाल की अपनी सभी रैलियाँ रद्द करने का निर्णय लिया है।
राजनैतिक दलों को सोचना चाहिए कि ऐसे समय में इन रैलियों से जनता व देश को कितना ख़तरा है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 18, 2021
पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यामध्ये निवडणुका होत असून राहुल यांनी 4 टप्प्याच्या प्रचारानंतर पश्चिम बंगालमध्ये प्रचार सुरु केला होता. आत्तापर्यंत 5 टप्प्यामध्ये मतदान झालं आहे. अजून तीन टप्प्यात मतदान बाकी आहे. या तीन टप्प्यात राहुल यांच्या मोठ्या प्रमाणात सभा होणार होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात सभा होत आहे. या सभांवरून मोदी आणि अमित शहा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राज्यातील ऑक्सिजनच्या समस्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना फोन केला असता, त्यांना मोदी प्रचारात व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं.
मोठा दिलासा; मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त https://t.co/vuXvPVTfCK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
यावरुन देशातील जनता मरत असताना मोदी पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशी टीका मोदींवर करण्यात आली होती. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 61 हजार नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 1 हजार 501 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच पश्चिम बंगालमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतल्यानं त्यांचं कौतुक केलं जात आहे.