बंगळुरु : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं कोलकाताचा ३८ धावांनी पराभव केला आहे. बंगळुरुनं प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २०४ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १६६ धावाच करु शकला. बंगळुरुकडून मॅक्सवेलनं ७८ धावा केल्या. तर डिव्हिलियर्सनं ३४ चेंडूत ७६ धावा कुटल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलनं सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर आरसीबीकडून काईल जेमिसननं ३ बळी घेतले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या संघाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.
राखी सावंत आयपीएलवर भडकली https://t.co/xlOCW2hRrL
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
बंगळुरुने कोलकात्यासमोर २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे झटपट फलंदाजी करण्याच्या नादात सलामीवीर शुबमन गिल ९ चेंडूत २१ धावा, राहुल त्रिपाठी २० चेंडूत २५ धावा, नितीश राणा ११ चेंडूत १८ धावा, तर दिनेश कार्तिक केवळ २ धावा करुन तंबूत परतला. कर्णधार ईऑन मॉर्गनही २३ चेंडूत २९ धावा करुन तंबूत परतला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर फटका मारताना थेट कोहलीच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेलनं आक्रमक फलंदाजी करत संघाच्या आशा कायम ठेवल्या.
That's that from Match No.10.@RCBTweets win by 38 runs to register their third win of the season so far. This is the first time in IPL that the #RCB have won their first 3 games.#VIVOIPL pic.twitter.com/Ei90mgn2iD
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, तोही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कुंभमेळा समाप्तीची घोषणा https://t.co/Otow6mtdk5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
तत्पूर्वी, बंगळुरुला डावाच्या सुरुवातीलाच दोन धक्के बसले. कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटिदार झटपट बाद झाले. विराट ५ धावांवर बाद झाला. तर रजत पाटिदार वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडिक्कल जोडीनं बंगळुरुचा डाव सावरला.
मात्र देवदत्त पडिक्कल २५ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल जोडीनं संघाच्या धावसंख्येत भर घातली. मॅक्सवेल पॅट कमिन्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हरभजन सिंगच्या हाती झेल देऊन बाद झाला. तिथपर्यंत बंगळुरुने सन्मानजनक धावा केल्या होत्या.
What a special evening, today.
3 out of 3 wins & my debut for this amazing franchise 13 years ago, on this day. Thank you to each one of you for your love & support. ❤️@RCBTweets pic.twitter.com/fTLoVsNbU3— Virat Kohli (@imVkohli) April 18, 2021