मुंबई : दमनची जी बुक फार्मा कंपनी महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन देणार आहे. त्याच कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिस आयुक्तांना जाब विचारला. विरोधी पक्षाच्या सांगण्यावरुन रेमडेसीवीर का देण्यात येत आहे? म्हणून राज्य सरकार कंपनीच्या मालकाला त्रास देत आहे, असे फडणवीस म्हणाले.
गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही – फडणवीसhttps://t.co/ZtxRmZO2zu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले आहे. ही घटना योग्य नाही. आपल्या महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
रेमडेसिवीरच्या नावाने 35 हजारांना विकत होते पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी https://t.co/64jk232FyD
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
देवेंद्र फडणवीस मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ब्रुक्स फार्मा कंपनीने आपल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स ही कायद्याचे पालन करुन दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली होती, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.
लॉकडाऊनमुळे पुण्याहून सोलापूरला येताना दोन भावंडांचा अपघाती मृत्यू https://t.co/1PByJaLPGy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.
भाजप राज्य सरकारला 50 हजार रेमडेसिवर देणार भेट, त्या कंपनीच्या मालकाला घेतले ताब्यात #surajyadigital #भाजप #bjp #रेमडेसिवर #remdesiver #company #कंपनी pic.twitter.com/nImIHn9cX3
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.