सोलापूर : सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशासह इतर देशांत झपाट्याने वाढत आहे. यावर रामबाण उपाय रेमडेसिवीर इंजेक्शन उपयोगी पडत आहे. त्यामुळे त्याची देशभरात मागणी वाढली आहे. मात्र त्यासाठी लागणारा कच्चा माल सोलापुरातून देशभर पुरवला जात असल्याचे म्हटल्यावर आपणास विश्वास बसेल का? परंतु हे खरे आहे. याविषयी जाणून घेऊया सविस्तर.
जेईई मेन 2021 परीक्षा पुढे ढकलली https://t.co/BzHzTyAUMv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
सोलापुरातील उद्योगपती राम रेड्डी यांच्या बालाजी अमाईन्स केमिकल कंपनीमधून देशातील प्रमुख 7 औषध कंपन्यांना हा रेमडेसिवीरसाठी लागणारा कच्चा माल पुरविला जात आहे. बालाजी अमाईन्स कंपनी ही सोलापुरातील विविध प्रकारच्या औषधांना लागणारा कच्चा माल पुरविणारी कंपनी आहे. जगातील अनेक नामवंत कंपन्यांना विविध रोगांवरील औषध बनविण्यासाठी ही कंपनी केमिकलचा पुरवठा यापूर्वीपासूनच करत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनावर रेमडेसिवीर हे इंजेक्शन गुणकारी ठरले आहे. त्यामुळे इंजेक्शनची मागणी संपूर्ण जगात वाढली आहे. अशा स्थितीत हे इंजेक्शन बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल हा सोलापुरातूनच जात असल्याची बाब आता पुढे आली आहे. हे इंजेक्शन बनविण्यासाठी सुमारे 16 ते 17 विविध प्रकारचे घटक वापरले जातात. त्यापैकी अमाईन, डायमिथाईल फार्मामाईड आणि असिटोनायट्रायल हे घटक सोलापुरातील बालाजी अमाईन्समध्ये निर्माण केले जातात.
लॉकडाऊनमुळे पुण्याहून सोलापूरला येताना दोन भावंडांचा अपघाती मृत्यू https://t.co/1PByJaLPGy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
देशातील नामवंत 7 कंपन्यांना हे घटक पुरविले जात असल्याची माहिती कपंनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी दिली. संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल सोलापुरातील कंपनी करत असल्याने बालाजी अमाईन्सने आता जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक गुणकारी औषधांना लागणारे विविध प्रकारचे केमिकलही या कपंनीतून विविध औषधनिर्माण कंपन्यांना पाठविले जात असून अनेक वेळा बाहेरील देशांतही काही घटक निर्यात केले जात असल्याची माहिती राम रेड्डी यांनी दिली आहे.
रेमडेसिवीरच्या नावाने 35 हजारांना विकत होते पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी https://t.co/64jk232FyD
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
बालाजी अमाईन्स केमिकल्स कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलची निर्मिती केली जाते. सध्या कोरोनामुळे मागणी वाढलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शमध्ये वापरले जाणारे तीन घटक अमाईन, डायमिथाईल फार्मामाईड, असिटोनायट्रायलचा पुरवठा देशातील जवळपास 7 औषधनिर्माण कंपन्यांना केला जात असल्याचे राम रेड्डी (व्यवस्थापकीय संचालक, बालाजी अमाईन्स) यांनी सांगितले. यामुळे सोलापूरचे नाव आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होत आहे.