वर्धा : राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. वर्धा जिल्ह्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. रेमडेसिव्हीरचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र आता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाइफ सायन्सेस ही कंपनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला होता.
कोरोना रुग्णवाढीला निवडणुकांसोबत जोडणे योग्य नाही : अमित शहा https://t.co/RKoqcaYvH7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असताना महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. वर्धा जिल्ह्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत प्रयत्न केले होते.
ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन https://t.co/69e7V4LyPB
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. त्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. आता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाइफ सायन्सेस ही कंपनीही रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे. देशभरात रेमडेसिविर हे औषध तयार करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. यात वर्ध्यातील आणखी एका कंपनीचा समावेश होणार आहेय. जेनेटिक सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून हे उत्पादन करण्यात येणार आहे. कंपनीला उत्पादनासाठी परवानगी मिळणे वर्धा जिल्हावासियंसाठी आनंदाची बाब ठरणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. या कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादन निर्मितीस परवानगी मिळावी यासाठी गडकरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जेनेटिक लाइफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे प्रमुख संशोधक आणि वैज्ञानिक डॉ. एम. डी. क्षीरसागर हे आहेत. कंपनीत लाइफ सेव्हिंग ड्रग्ज क्रिटिकल केअर इंजेक्शन्स, अँजिओग्राफीमध्ये वापरली जाणारी उत्पादने, सीटी स्कॅन, एमआरआय आणि आणीबाणीच्या वापरासाठीची उत्पादने बनवली जातात.
सरकारने निर्णय घेतला मागे;आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही https://t.co/7jvhs64Sn1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
या कंपनीत लवकरच रेमडेसिव्हीरचं उत्पादन सुरू होणार आहे. रोज 30 हजार व्हायल तयार करण्याचा दावा केला जात आहे. ही बाब सर्वांनाच दिलासा देणारी ठरणार आहे.