पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘दोघी’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट त्यांनी तयार केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भावे यांच्या चित्रपटांचे खूप कौतुक झाले.
ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं आहे. गेल्या १० दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय नितळ, अस्तु देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपट त्यानं दिग्दर्शित केले आहेत. सुमित्रा भावे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
सुमित्रा मावशी… खूप खूप प्रेम!❤️🙏 काही माणसं अमर रहावीत, कधीच जाऊ नयेत असं मला वाटायचं त्यापैकी एक म्हणजे सुमित्रा भावे🙏 प्रेक्षकांना नवी दृष्टी तुम्ही दिलीत..जीवन आणि समाज यांचं प्रतिबिंब तुमच्या चित्रपटात दिसलं तेव्हा एक समृद्ध नजर मिळाली सिनेमा पाहण्याची.. #SumitraBhave pic.twitter.com/9fH5M0BHRR
— Neelima Kulkarni (@starneelima) April 19, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्यावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक, सामाजिक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. चौकटीबाहेरचा विचार करून, चाकोरी मोडून चित्रपटाची निर्मिती करणारी दिग्दर्शिका हरपल्याची भावना भावे यांच्या निधनामुळे व्यक्त होत आहे.
कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' धावणार https://t.co/iC5CN816js
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु असे उत्तम चित्रपट त्यांनी तयार केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांच्या चित्रपटांचं कौतुक झालं. अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. भावे यांनी त्यांच्या चित्रपटांमधून अनेक सामाजिक प्रश्न हाताळले.
सुमित्रा भावे यांनी टाटा इन्स्टीट्यूटमधून समाज विज्ञान विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर १० वर्ष त्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिकवत होत्या. १९८५ मध्ये स्त्रीवाणीसाठी त्यांनी पहिली शॉर्ट फिल्म केली. बाई नावाच्या फिल्म मधून त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला होता. या फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये दोघी हा सिनेमा दिग्दर्शित केला. वास्तुपुरुष, घो मला असा हवा, हा भारत माझा, संहिता असे अनेक सिनेमे दिग्दर्शित केले होते.
सरकारने निर्णय घेतला मागे;आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही https://t.co/7jvhs64Sn1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
लेखिक-दिग्दर्शिका-सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भावे यांचं आज सकाळी सव्वासात वाजता पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. गेले दोन महिने त्या फुफ्फुसांच्या विकाराने त्रस्त होत्या. सध्याची कोविडची परिस्थिती बघता व एरवीही अशा प्रसंगी गर्दी असू नये हे सुमित्रा भावे यांचं मत लक्षात घेता, थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.