मुंबई : बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा रिपोर्ट 48 तासांच्या आतला हवा. गोवा, उत्तराखंड, गुजरात, केरळ, दिल्ली एनसीआर आणि राजस्थान या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम लागू असणार आहे. ज्यांच्याजवळ रिपोर्ट नसेल, त्याची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अँटीजेन चाचणी केली जाणार आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1384058294000513026?s=19
महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारनं कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. राज्य सरकारनं आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारनं कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. राज्य सरकारनं आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला ‘उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे’ म्हणून घोषित केले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1384054345054838787?s=19
या ठिकाणांहून प्रवास करणार्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल. आज याबाबत राज्य सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत.