नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
सर्वसामान्य नागरिकांसाठी 48 तासांत केंद्र सरकारचे 5 मोठे निर्णय https://t.co/Y3tFpgOdIe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उल्लेखनीय म्हणजे बलबीर सिद्धू सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत संगरूरच्या रॅलीत सहभागी झाले होते. ‘शेती वाचवा’ कार्यक्रमात स्टेज सेक्रेटरी म्हणून काल बलबीर सिद्धू यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. ते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याही संपर्कात आले होते.
'देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली ?, व्हायरल पोस्ट लगेच केली डिलिट https://t.co/MA2il4WWVk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी समोर आली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
इस्रायलने कोरोनावर केली मात, मास्कला केले बाय – बाय, कसे ते वाचा सविस्तर, https://t.co/v4fc4e4eMK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार करणार नसल्याचं राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. राहुल गांधी यांनी इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना सभांबाबत विचार करण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आहे