मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्या (22 एप्रिल ) रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत.
ब्रेकींग – महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन #लॉकडाऊन #lockdown #maharashtra #महाराष्ट्र pic.twitter.com/yFNelIbqEg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधन करतील अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचं हे संबोधन आणि लॉकडाऊनचा निर्णय लांबणीवर पडलं आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्या घटनास्थळी भेट देतील आणि त्यानंतर जनतेला संबोधन करतील, अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार #surajyadigital #ChiefSecretary #लॉकडाऊन #lockdown #सुराज्यडिजिटल #cm #संवाद #cancelled pic.twitter.com/6BVSgPUnQu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील.
नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर, मोदी – शहांसह अनेकांच्या प्रतिक्रिया, चौकशीचे आदेश https://t.co/31AmFVBfk0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
काल मंगळवारी (20 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनीही कठोर लॉकडाऊनच्या निर्णयबाबत सहमती दर्शवली. राज्यात कडक लॉकडाऊन लावून राज्यातील नागरिकांचे लसीकरण व्हावे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
परिस्थिती ओळखून सध्यातरी कडक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. लॉकडाउन करणं गरजेचं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबतची माहिती देतील. जिल्हाबंदी होणार नाही, पण विनाकारण फिरणाऱ्यांना रोखलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू, 11 जणांची नोंद https://t.co/r6JDs6ocZv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.
टेंभुर्णीत विनाकारण फिरणार-यांची कोरोना टेस्ट, ५० जणांची केली चाचणी, निघाला एक पॉझिटिव्ह https://t.co/D8IPZNPmny
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. आंतरजिल्हा प्रवास महत्त्वाच्या कारणांसाठीच केला जाऊ शकतो. मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने करण्यात येईल. खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने चालवल्या जाऊ शकतात. लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश असेल. आयकार्ड तपासून प्रवेश देण्यात येईल.
सनरायझर्स हैदराबादचा सूर्योदय, यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय https://t.co/wGOR5OA2EE
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021