अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याला एकूण 60 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. मात्र, काल (ता. 20) अचानक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. ऑक्सिजनचा एक टँकर तातडीने मागवण्यात आला होता. मात्र, हा टँकर रात्री पुण्याच्या हद्दीत अडवण्यात आला. मात्र, मी फोन करून वेगळ्या भाषेत समज दिल्यानंतर हा टँकर सोडण्यात आला, अशी धक्कादायक माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू, 11 जणांची नोंद https://t.co/r6JDs6ocZv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
अहमदनगर मधल्या ऑक्सिजन आणिबाणीची बातमी येईपर्यंत प्रशासन काहीही बोलायला तयार नव्हते. वृत्तवाहिनीच्या बातमीनंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी घटनाक्रम सांगितला. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री चाकणहून नगरला जाणारा ऑक्सिजनचा टँकर पुणे जिल्ह्यात थांबवण्यात आला होता.
नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर, मोदी – शहांसह अनेकांच्या प्रतिक्रिया, चौकशीचे आदेश https://t.co/31AmFVBfk0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
बाळासाहेब थोरात यांनी मुख्य सचिवांना संपर्क करून नगर जिल्ह्याकडे निघालेला टँकर थांबवणे योग्य नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर नगरकडे टँकर निघाला. त्यामुळे राज्यात सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडीसीविरचं वाटप समान व्हावं अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अहमदनगरमध्ये काल ऑक्सिजनअभावी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. मॅक्स केअर नावाच्या मोठ्या रूग्णालयात शंभर ते सव्वाशे कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्या रुग्णालयासह नगर शहरातल्या अनेक खाजगी रुग्णालयातला ऑक्सिजनचा साठा संपत चालला होता.
धक्कादायक! अंबाजोगाईत ६ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन खंडित झाल्याने मृत्यू, मात्र प्रशासनाने आरोप फेटाळला https://t.co/ups04lFuCO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
धावाधाव केल्यावर पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथून ऑक्सिजनचा एक टँकर निघाला. तो पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अडवला. मुख्यमंत्र्यांपर्यंत फोनाफोनी झाली. अतिशय शेवटच्या क्षणी ऑक्सिजनचा टँकर नगरमध्ये दाखल झाला त्यामुळे पुढचा धोका टळला. अहमदनगरमध्ये काल शहरातील बहुतांश रुग्णालयातील ऑक्सिजन संपत चालले होते. काही खाजगी रुग्णालयांनी ही बाब जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या लक्षात आणून दिली.
नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू, 11 जणांची नोंद https://t.co/r6JDs6ocZv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021