मुंबई : राज्यात ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. राज्यातील तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता उर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असेही उदय सामंत म्हणाले.
वीज दरवाढीचा झटका, जास्त पैसे मोजावे लागणार https://t.co/Kqylq1VhLl
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय. राज्यात लॉकडाउनही लावण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत नियोजित वेळापत्रकानुसार जर विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर जावं लागणार असेल तर त्यांना लॉकडाउनच्या निकषांतून सूट द्यावी लागेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नाशिक दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा गेला 24 वर, मात्र चालूय 'राजकारण', विरोधी पक्षनेत्यांचे वक्तव्यातून आले समोर #nashik #lackofoxygen #24death #नाशिक #24मृत्यू #surajyadigital #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Z5CXYIFVwf
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अखेर आज महाराष्ट्रातील १३ अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित सर्व परिक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. विद्यापीठांना आवश्यक त्या सोयी सुविधा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून पुरवल्या जातील पण कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, याची जबाबादारी विद्यापीठांच्या कुलगुरूंची असेल. या सर्व विद्यापीठांना दोन दिवसात या संबंधीच्या आदेशाचे पत्रक मिळेल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
पॉईंटमन मयुर शेळकेने वाचवला चिमुकल्याचा जीव, होतोय कौतुकाचा वर्षाव, पहा व्हिडिओ, रेल्वेने दिलेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम मयुर देणार त्या 'अंध' मातेलाhttps://t.co/DOcdLsV2F9
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
“राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने परिक्षांबद्दल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. चर्चेअंती असं ठरवण्यात आलं की राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित परिक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील. अशा वेळी विद्यार्थी शिक्षणापासून किंवा परिक्षेपासून वंचित राहणार नाहीत याकडे सर्व कुलगुरूंनी लक्ष द्यावं. तसंच, शिक्षणाचा समावेश हा अत्यावश्यक सेवांमध्ये करावा, जेणेकरून झालेल्या परिक्षांचे मूल्यमापन व इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी शिक्षकांना मुभा मिळेल आणि परिक्षांचे निकाल लावणं सोपं जाईल”, असं ते म्हणाले.
धर्म माणुसकीचा ! ६० हिंदू लोकांवर मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार, रोजा ठेवूनही सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या https://t.co/3AHCSusyGl
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021