नवी दिल्ली : मास्क न लावणं एका नवरीला चांगलंच महागात पडलं आहे. चंडीगडमध्ये बुधवारी एक दिवसाचा लॉकडाऊन होता. बुधवारी (ता.21) दुपारी सेक्टर 8/9 च्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त होता. तिथून एक कार गेली. कारमध्ये ड्रायव्हर शेजारी बसलेल्या नवरीनं मास्क लावला नव्हता. याबाबत विचारले असता, मेकअप खराब होईल म्हणून मास्क लावला नाही, असं कारण नवरीच्या भावानं सांगितलं. मात्र पोलिसांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही आणि चालान कापलं.
"संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हे मोदींच्या भाषणाचे सार" https://t.co/SJyftiiGuv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
चंडीगडमध्ये बुधवारी रामनवमीवर एक दिवसाचा लॉकडाऊन लावला होता. यादरम्यान पोलिसांनी कडक नियमावली लावली आहे. सेक्टर-8/9 च्या लाइट प्लॉटवर कारमध्ये बसलेल्या नवरीने मेकअप खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मास्क लावला नव्हता. मास्क न लावणं नवरीला महागात पडलं आहे. त्यानंतर चंडीगड पोलिसांनी ती गाडीच थांबवली आणि विना मास्क असल्याने एक हजार रुपयांचं चालान कापण्यात आलं.
धर्म माणुसकीचा ! ६० हिंदू लोकांवर मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार, रोजा ठेवूनही सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या https://t.co/3AHCSusyGl
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी नवरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी तिच्या मेकअपचं कारण दिलं. मेकअप बिघडेल म्हणून मास्क लावला नसल्याचं यावेळी पोलिसांना सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही आणि कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण सांगून चालान कापण्यात आलं.हा प्रकार काल बुधवारी दुपारी घडला आहे.
सेक्टर 3 ठाण्यात तैनात एएसआय जितेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात सेक्टर 8/9 च्या नाक्यावर बंदोबस्त लावण्यात आला होता. यादरम्यान तेथून एक कार गेली. नवरीला गुरुद्वाऱ्यात घेऊन जाणाऱ्या त्याच्या भावाने सांगितलं की, मेकअप असल्याकारणाने नवरीने मास्क लावला नाही. मास्क लावला असता तर नवरीचा मेकअप खराब होईल.
शिखर धवनने केला 'गब्बर' पराक्रम https://t.co/8YHpgBPChu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
त्यामुळे तिला ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसविण्यात आलं होतं. मात्र मास्क लावला नव्हता. तर या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, नियम सर्वांसाठी समान आहेत. यातून कोणाचीही सुटका होणार नाही.