मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच आता राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे. http://covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन तुम्ही ई- पाससाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट करून याची माहिती दिली.
नदीम – श्रवण जोडीतला संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन, खूप रोमँटिक गाणी प्रसिद्धhttps://t.co/hRm2nT1hJm
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनाने पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. तसेच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई-पासची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी रितसर अर्ज करावा लागणार आहे.
विरारमधील रूग्णालयाला आग; मृतांचा आकडा 13 वर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://t.co/zYuCLhYDnb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई-पास काढावा लागणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुरुवारी रात्रीपासून राज्यात प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यावर अनेक निर्बंध आले. 1 मे पर्यतच हे नियम लागू असणार आहेत. त्यामुळे या कालावधीत काही महात्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची आवश्यकता भासली तर नागरिकांना ई-पास वापरावा लागणार आहे. असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
* पास मिळवण्यासाठी काय करावं ?
– ईपास मिळवण्यासाठी सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in/या संकेतस्थळाला भेट द्यावी.
– त्यानंतर इथ apply for pass here या पर्यायावर क्लिक करावं.
– पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे. तो जिल्हा निवडावा.
– आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत
– प्रवास करण्याठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावे लागेल.
– कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन ते अपलोड करावे.
– अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
– पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई पास डाऊनलोड करु शकता.
– या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
– प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं तर त्यांना पास दाखवता येईल.
For interstate and inter-district emergency travel, you can apply for an E-Pass at https://t.co/jR6ROcBcPU
You can also walk in to your nearest Police Station for assistance.
We urge all citizens to apply for an E-Pass only in the case of extreme emergencies.#EPassForTravel
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 23, 2021
आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.
आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.#EPassForTravel
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 23, 2021
* ई – पासबाबत महत्त्वाचे मुद्दे
– अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येईल.
– कोणत्याही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो
– अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ईपासची गरज नाही.
– ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींना सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस ठाण्याला भेट द्यावी. त्या ठिकाणी त्यांना मदत केली जाईल.
पतंजली योगपीठात कोरोनाचा शिरकाव, रामदेव बाबांची कोरोना टेस्ट होणार ? https://t.co/tlMIQf4Osy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021