नवी दिल्ली : झायडस कॅडिला कंपनीच्या ‘विराफीन’ या औषधाला भारतात कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) ही परवानगी दिली. कंपनीचा दावा आहे की, हे औषध घेतल्यानंतर 7 दिवसांच्या आत रुग्णांची RT PCR टेस्ट निगेटीव्ह आली असून 91.15 टक्के रुग्णांवर याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे रुग्णाला योग्यवेळी हे औषध दिल्यास कोरोनापासून बचाव होण्याची शक्यता वाढली आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची 'रोड शो' वर बंदी https://t.co/4hjHJdGRCd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
डीसीजीआयने ( ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) या औषधाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी हे औषध रामबाण उपाय ठरणार आहे. हे औषध घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसात आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणार असल्याचा दावा झायडस कॅडिलाने केला आहे. 91.15 टक्के रुग्णांवर या औषधांचा प्रयोग करण्यात आला असून त्यातून हे सिद्ध झाल्याचंही झायडसने म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वेरिफीन ही दवा सौम्य लक्षणे असलेल्या 18 वर्षांवरील व्यक्तिंवर परिणामकारक ठरली आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये 91.15 टक्के रिझल्ट्स चांगले आले आहेत, असा दावा कंपनीने केला आहे. या निष्कर्षावरून वेळेतच रुग्णांना औषध दिल्यास ते लवकर बरे होण्यास मदत होते. त्यामुळे आजार बळावण्यापासून रोखला जाऊ शकत असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता हवाई दलाची मदत; ऑक्सिजन कंटेनर 'एअरलिफ्ट' https://t.co/7qk3FvkamN
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
PegIFN गेल्या अनेक वर्षांपासून क्रोनिक हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी रुग्णांमध्ये मल्टिपल डोससह सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. Pegylated Interferon Alpha 2b च्या वापरानंतर रुग्णांना सप्लिमेंट ऑक्सिजनची कमी आवश्यकता भासल्यांच एका परीक्षणातून दिसून आलं आहे. त्यामुळे हे औषध रेसपिरेटरी डिस्ट्रेसला कंट्रोलमध्ये ठेवण्यात सक्षम असल्याचं दिसून येत आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे.
मोठी दुर्घटना – जीप गंगेत कोसळली; 9 मृतदेह https://t.co/Ui2nVrKfJ4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
भारतात 20 ते 25 केंद्रावरील 250 रुग्णांवर या औषधांची तिसरी ट्रायल घेण्यात आली. त्याचे विस्तृत निष्कर्ष लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सुरुवातीलाच हे औषध दिल्यावर रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचा दावाही या कंपनीने केला आहे. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रुग्णांना हे औषध देण्यात येणार आहे. सर्वच रुग्णालयांमध्ये हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही काही राष्ट्रीय बातमी नाही; आरोग्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य https://t.co/Mjv5owIlCP
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021