मुंबई : विरारच्या रुग्णालयातील आगीत १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. ही घटना राष्ट्रीय बातमी नसल्याचे टोपे म्हणाले. दरम्यान, लोकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री फक्त बातमीच्या माध्यमातून पाहतात, यापेक्षा शरमेची बाब नाही. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केली.
राज्य सरकार आता तरी जागे व्हा!!#surajyadigital #virar #Pravindarekar #bjp #भाजप #fire
नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे CMOMaharashtra 'जबाबदार' आहेhttps://t.co/M2xEpiwwSJ— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या रुग्णालयातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिक ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेला अवघे २ दिवस झालेले असताना विरारमध्ये घडलेली ही घटना म्हणजे राज्याला मोठा धक्का आहे.
विरारमधील रूग्णालयाला आग; मृतांचा आकडा 13 वर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://t.co/zYuCLhYDnb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
मात्र, दुसरीकडे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या एका विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंतप्रधानांशी याबाबत चर्चा झाली का ? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता राजेश टोपे म्हणाले की, ‘चर्चा झाली पण ही नॅशनल न्यूज नाही.’
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजेश टोपेंना त्यानंतर पत्रकाराने विचारले कि ‘१३ जणांचा मृत्यू झाला ही नॅशनल न्यूज नाही का?’ या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले कि, ‘अरे बाबा, राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून 5 लाखांची, राज्य सरकारकडून ५ लाखांची अशी १० लाखांची मदत देणार आहोत.
महाराष्ट्रात प्रवासासाठी लागणार ई-पास, वाचा सविस्तर बातमी https://t.co/LwenMMgTNj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
नाशिकमधील घटनेप्रमाणेच इथेही मदत दिली जाईल. कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. १० दिवसांत यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्देवी आहे’ असं म्हटलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी.
महाराष्ट्रात कोविड मृत्यूचे तांडव सुरू आहे
विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी ऑक्सिजन तर कधी आग. ठाकरे सरकारनी कोविड रुग्णां साठी भारत सरकार आणि सैन्याची मदत घ्यावी
तज्ञांद्वारे कोवीड केंद्रांचे ऑक्सिजन आणि आग सुरक्षेचे ऑडिट करावे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करावे pic.twitter.com/C9ZoWanUqJ
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 23, 2021
महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’ अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
अवकाळीचं संकट ! 'तो' मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा येणार #surajyadigital #rain #पाऊस #अवकाळी #संकट #crisis pic.twitter.com/9HakXeCCro
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021