औरंगाबाद : भारुडरत्न निरंजन भाकरे यांचे शुक्रवारी कोरोनाने निधन झाले. ते 62 वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने ते राज्यभरात प्रसिद्ध होते. ‘सोंगी भारुड’ सादरीकरणानंतर काही वर्षांतच ते प्रसिद्ध झाले होते. तसेच भाकरे यांनी परदेशातही अनेक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
बुरगुंडा हरपला…भारुडरत्न निरंजन भाकरे (ब्लॉग)https://t.co/C08KFuUcL2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
समस्त महाराष्ट्रात ‘भारूडरत्न’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचे शुक्रवारी (23 एप्रिल) निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
भारुड या लोककला प्रकाराला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. मातीतल्या लोककलेला ओळख मिळवून देणारा सच्चा कलाकार हरपला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना! pic.twitter.com/7CUjXl3krb
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) April 23, 2021
महाराष्ट्राला समृद्ध असा लोककलेचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे घेऊण जाण्याचं काम मराठवाड्याचे अस्सल लोककलावंत निरंजन भाकरे यांनी केले. भारुड या लोककलेला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते. एकनाथ महाराज यांची भारूडं आधुनिक काळात लोकांच्या ओठांवर आणणारे लोककलावंत म्हणून निरंजन भारकरे यांची ओळख आहे.
'भारुडरत्न' निरंजन भाकरे यांचे आज निधन झाले. 2011 साली जागर हा जाणिवांचा पदयात्रेत नायगाव (सातारा) ते पुणे यात सहभागी होत प्रत्येक गावात स्त्री भ्रूणहत्या विरोधात भारुड भाकरे यांनी सादर केले होते. pic.twitter.com/TeVNcf6tpV
— Supriya Sule (@supriya_sule) April 23, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातून शेवटपर्यंत जनजागृती करण्याचे काम केले. त्यांनी व्यवनमुक्तीची पहाट हा कार्यंक्रम किक्येक वर्षे केला. त्यांच्या या कार्यक्रमामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. तसेच अनेक टिव्ही शो आणि वेरुळ अजिंठा महोत्वसामध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. भरुडमधील सोंगी भारूड या प्रकारमुळे त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले. त्यांनी सादर केलेलं ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ हे भारुड तर आजही कित्येकजण आवडीने पाहतात.
https://twitter.com/mesandeeppathak/status/1385657190078238722?s=19
महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक लोककलावंत होऊन गेले. मात्र, भाकरे यांचे लोककलेतील काम कायम अजरमार राहील असेच आहे. त्यांच्या बये तुला गुरगुंडा होईल गं, हे भारुड अजूनही अनेकांचा तोंडावर आहे. त्यांच्या भारुड सादरीकरणामुळे त्यांना संपूर्ण मराष्ट्रात ओळख मिळाली होती. त्यांना लोककलेचा हा वारसा आपल्या परिवाराकडून मिळाला होता. हा वरसा नंतर त्यांनी संपूर्ण हयातभर जपला.
ऑक्सिजनसाठी शरद पवार मैदानात, १९० साखर कारखान्यांना दिले आदेश https://t.co/uaDDGWn7Lt
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021