मुंबई : पुणे येथे आज (25 एप्रिल) कोरोनाचे 4, 631 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 55 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच, आज तब्बल 4,759 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 49,289 जणांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4,00,117 इतकी झाली आहे. तसेच, पुण्यात आतापर्यंत 6,498 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच पुण्यात आतापर्यंत 3, 44,330 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* आज तब्बल 8 हजार 478 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
मुंबईत आज (25 एप्रिल) कोरोनाचे 5,542 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मुंबईत आज तब्बल 8,478 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 75,740 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, मुंबईत आतापर्यंत 12,783 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच, मुंबईत आतापर्यंत 5,37,711 जण कोरोनामुक्त झाले आहेत.