नवी दिल्ली : आयपीएल सुरू असतानाच चेन्नई सुपर किंग्सवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड संचालक आणि अध्यक्ष एल. सबारत्नम यांचे रविवारी निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. सबारत्नम हे 80 वर्षांचे होते. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनचे • कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. दरम्यान चेन्नईच्या संघाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात https://t.co/dkASI8kY63
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
आयपीएल 2021 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी आली आहे. संघाचे संचालक आणि अध्यक्ष एल सबरत्नम यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूची माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सबरत्नम यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे. सबारत्नम बराच काळ चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक होते. याआधी ते चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते. ते सबारत्नम इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरोमंडल शुगर्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते.
मोदींची घोषणा; पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार https://t.co/cqrkrdyWh4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
विशेष म्हणजे गेल्या वर्षी युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब होती. संघ लीगच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफसाठी पात्र होऊ शकला नाही. मात्र, या मोसमात संघाने शानदार पुनरागमन केले आहे. या मोसमातील पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईने सलग चार सामने जिंकले आहेत.
भारताला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यास अमेरिका तयार https://t.co/JI87xt17kz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
चेन्नईचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 28 एप्रिलला आहे. टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या मोसमातील चेन्नईने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. तसेच, त्यांचा नेट रन रेटही सर्व संघांमधील सर्वोत्तम आहे.