नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली भारताच्या मदतीसाठी धावला आहे. ब्रेट लीने भारतातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सीजनसाठी एक बीट कॉईन दान दिली आहे. बीट कॉईन ही एक डिजीटल क्रिप्टो करन्सी आहे. एका बीट कॉईनचं भारतातील मुल्य हे जवळपास 44 लाख रुपये इतकं आहे. दरम्यान, ब्रेट ली आधी ऑसी गोलंदाज पॅट कमिन्सनं भारताला ऑक्सीजनसाठी 50 हजार डॉलर्सची मदत दिली आहे.
आयपीएल : पंतप्रधान क्रिकेटर्सना म्हणाले, चार्टर्ड विमान वगैरे काही मिळणार नाही… ऑस्ट्रेलिया संघाचा दौरा नाहीय, खेळाडू आपल्या वैयक्तिक करारानुसार स्पर्धा खेळण्यासाठी गेलेतhttps://t.co/kYpffAwkSb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सनं 50 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 37 लाखांची मदत केली होती. पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल ठेवत आँस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं देखील भारताला मदत केली आहे. ब्रेट लीनं ऑक्सिजन खरेदीसाठी 1 बिटकाईन म्हणजेज 43 लाखांची मदत केली आहे.
Well done @patcummins30 🙏🏻 pic.twitter.com/iCeU6933Kp
— @BrettLee_58 (@BrettLee_58) April 27, 2021
ब्रेट लीनं मदत जाहीर करताना भारत हे माझं दुसर घर असल्याची भावना व्यक्त केली आहे. भारतातील कोरोना परिस्थितीवरून त्यानं चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने 50 हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत केली आहे. कमिन्सने पीएम केअर फंडाला ही मदत दिली आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
कमिन्सने त्याच्या या मदतीबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तसेच त्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंनादेखील अशीच मदत करण्याचे आवाहन केलं होतं. कमिन्सने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ”एक खेळाडू म्हणून माझ्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि मी पीएम केअर फंडासाठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,असं तो म्हणाला होता