नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2021 पर्यंत वाढवला जाणार नाही. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. त्यामुळे जुन्या दरानेच महागाई भत्ता मिळेल. कोरोनाचे संकट वाढल्याने कर्मचाऱ्यांना हा झटका बसणार आहे. कर्मचाऱ्यांना एरियर्सही मिळणार नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. तो 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार होता. मात्र यावरील निर्णय प्रलंबित आहे.
दिलासादायक ! राज्यात मागील 24 तासात तब्बल 71 हजार 736 जण कोरोना मुक्त, 6 दिवसात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त तर सोमवारी 5 लाख जणांचे लसीकरण; विक्रमी नोंदhttps://t.co/J7wPztIS0x
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
यंदा जुलैमध्ये केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता(DA) न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासकीय कर्मचार्यांसह लाखो पेन्शनधारकांची कमालीची निराशा झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
– पहिल्यांदा कोरोना रुग्णाची वेगळीच अडचण, ऐकून हसू येईल, व्हायरल व्हिडिओ #surajyadigital #corona #patient #सुराज्यडिजिटल #रुग्ण #vairalvideohttps://t.co/LK4XExsVPg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
आता ट्रॅव्हल अलाऊन्स (TA) देखील वाढविला जाणार नसल्याचेही समजते. सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सच्या गणनेनुसार जुलै 2021 मध्ये कर्मचार्यांचा डीए केवळ १७ टक्केच राहणार आहे. त्यामुळे यावर्षी टीए वाढणार नाही. यासंदर्भात राष्ट्रीय परिषद जेसीएममधील स्टाफ साईडचे सचिव शिवगोपाल मिश्रा म्हणतात, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचा टीए तेव्हाच वाढतो, जेव्हा डीए 25 % किंवा त्याहून अधिक असतो.
प्रवासी भत्ता म्हणून केंद्रीय कर्मचार्यांना हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याचे पैसे, टॅक्सी खर्च आणि खाद्य बिले इत्यादी मिळतात. प्रवास भत्त्यामध्ये रस्ते, हवाई, रेल्वे आणि समुद्रमार्गाने प्रवास करण्याचे भाडे देखील समाविष्ट आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या https://t.co/tP31PmL6uY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचार्यांना मिळालेला डीएचा लाभ गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून थांबविला गेला. पण जुलैपासून तो पुन्हा सुरू होणार होता. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उत्तरामुळे हे पक्क झालं होतं. जुलैमध्ये डीएच्या वाढीसह मागील थकबाकीही देण्यात येईल, असा विश्वास होता. यामुळे विद्यमान डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज होता. परंतु काही दिवसांपूर्वीच डिए वाढणार नसल्याचे समजले.
हेच खरे कोरोना योद्धे, काय वाटते फोटो पाहून #surajyadigital #coronavirus #Yodha #police #पोलीस #महाराष्ट्र #maharashtra – घरापासून दूर आभाळच पांघरून करून घेतलेली 'क्षणभर विश्रांती ' माणसेच आहेत ती १८ -१८ तास डूटी करून दमतात बिच्चारी….महाराष्ट्र पोलिसांना मनापासून सलाम..!! pic.twitter.com/E4oJQ5cHdA
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021