मुंबई : पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. होती. आज नाशिकच्या सटाणा तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे. तसेच, पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे.
नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, नवरा- नवरीने पीपीई कीट घालून केले लग्न, पहा व्हिडिओ https://t.co/U4FEOKJnWK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांना गारपिटीनं झोडपले. तर पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. तर राज्यांत काही भागांमध्ये वादळी वारं सुरू झालं आहे. त्यातच आता आगामी काही तासांत राज्यांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे, नाशिक, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
#WeatherUpdate | Isolated rain/snow and thunderstorms are forecast over Sikkim, Tamil Nadu, Karnataka, Goa, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh, Sub-Himalayan West Bengal, Assam, Andaman & Nicobar Islands, and Lakshadweep.
Read: https://t.co/XXSkX30iqr pic.twitter.com/LMEZ2yaipz
— The Weather Channel India (@weatherindia) April 26, 2021
महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेने वाढली होती. मात्र वाढत्या उष्णतेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात येत्या 48 तासात मध्य , कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी वादळी-वाराही राहण्याची शक्तता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिलासादायक ! राज्यात मागील 24 तासात तब्बल 71 हजार 736 जण कोरोना मुक्त, 6 दिवसात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त तर सोमवारी 5 लाख जणांचे लसीकरण; विक्रमी नोंदhttps://t.co/J7wPztIS0x
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामान सातत्यानं बदलत आहे. सोमवारी सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुण्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत काही ठिकाणी अंशतः गारपीट झाली आहे. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावाला मात्र अवकाळी पावसानं आणि गारपीटीनं अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामुळे या गावाचं रूप बर्फाच्छादित प्रदेशाप्रमाणे झालं होतं. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाला आलेला घास गारपीटनं हिरावून नेला आहे.
Today's update India (26/4/21)
Highest temperature:
Brahmapuri (Maharashtra) 43.3°C
Lowest temperature (plains):
Sikar (Rajasthan) 12.4°C
Highest rain:
Malappuram 5cm
Kasargod and Uttar Kannada 4cm
Courtesy imd— Anush Weather Nature and weather(TN ,Puducherry) (@AnushWeather) April 26, 2021
पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्याच्या साथीनं जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज सकाळपासून पुण्यातील तापमानदेखील वाढत असून पुणे शहरासह ग्रामीण भागात पावसाची शक्यता आहे.
काँग्रेसने राष्ट्रवादीला झापले; 'तीन पक्षाचे सरकार आणि घोषणा एकाकडून' https://t.co/Ie38dDH6Kt
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
याशिवाय केरळ राज्याच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीसह गोवा या राज्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबाद या भागातील शेतकऱ्यांना कालच्या अवकाळी पावासाचा चांगलाच फटका बसला आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या https://t.co/tP31PmL6uY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
येथील केळी आणि द्राक्षांच्या बागासोबतच इतर पिकांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. असं असलं तरी अजूनही धोका टळलेल्या नाही. मराठवाड्यापासून दक्षिण किनारपट्टीपर्यंत उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. याचा सर्वाधिक धोका मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना आहे.
1 जुलैपर्यंत महागाई भत्ता वाढवला जाणार नाही https://t.co/YPqF47EBBg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021