अहमदाबाद : आरपीएल 2021 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सनं पंजाबचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे. किंग्स पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 बाद 123 धावा केल्या होत्या. हे आव्हान कोलकातानं 16.4 षटकात 5 गडी गमावून पूर्ण केलं. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीनं 41 धावांची खेळी केली. तसेच, कर्णधार इयॉन मॉर्गननं सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या.
📸 Saying hello to Ahmedabad with a win! @prasidh43 @DineshKarthik @tripathirahul52 @Eoin16 #PBKSvKKR #KKRHaiTaiyaar #IPL2021 pic.twitter.com/dYRyhbTABW
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 27, 2021
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 20 वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ भिडले. या सामन्यात कोलकात्याने पंजाबवर 5 विकेट्स आणि 20 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासोबतच कोलकात्याने यंदाच्या स्पर्धेतील पराभवांची मालिका खंडित करत दुसरा विजय मिळवला आहे.
Award for CRED Power Player of the Match between @PunjabKingsIPL and @KKRiders goes to Shivam Mavi.@CRED_club #CREDPowerplay #VIVOIPL pic.twitter.com/HLmEPlqJaW
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2021
आजच्या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार ओईन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय कोलकात्याच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला निर्धारित 20 षटकात केवळ 123 धावा जमवता आल्या. पंजाबकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 31 तर ख्रिस जॉर्डनने 30 धावांची खेळी केली. तर कोकलात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने 3 तर पॅट कमिन्स, सुनील नारायण या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
123 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या. कोलकात्याची सुरुवात वाईट झाली. कोलकात्याने तीन षटकात 17 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर कर्णधार ओईन मॉर्गनने आणि राहुल त्रिपाठीने सावधपणे फटकेबाजी करत संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. अखेर मॉर्गनने कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याकडून ओईन मॉर्गनने सर्वाधिक 47 धावांची नाबाद खेळी केली. त्याला राहुल त्रिपाठीने 41 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
– पहिल्यांदा कोरोना रुग्णाची वेगळीच अडचण, ऐकून हसू येईल, व्हायरल व्हिडिओ #surajyadigital #corona #patient #सुराज्यडिजिटल #रुग्ण #vairalvideohttps://t.co/LK4XExsVPg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
17 धावांवर 3 विकेट गमावल्यानंर कोलकात्यासाठी राहुल त्रिपाठी (28) आणि कर्णधार ओईन मॉर्गनने (24) महत्त्वाची भागीदारी रचली आहे. दोघांनी 35 चेंडूत 50 धावांची भागीदारी रचत या सामन्यातील कोलकात्याचे आव्हान जिवंत ठेवलं होते. राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ओईन मॉर्गनने सावधपणे धावफलक हलता ठेवत धावफलकावर संघाचं अर्धशतक झळकावलं. आठव्या षटकात राहुल त्रिपाठीने ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर दोन चौकार लगावत गियर बदलला.
Safari Super Striker of the Match between @PunjabKingsIPL and @KKRiders is Chris Jordan.@TataMotors_Cars #SafariSuperStriker #VIVOIPL pic.twitter.com/x9WlS8S6QE
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2021