मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. त्यातच आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएस (MBBS) आणि एमडीच्या (MD) इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
दिलासादायक ! राज्यात मागील 24 तासात तब्बल 71 हजार 736 जण कोरोना मुक्त, 6 दिवसात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त तर सोमवारी 5 लाख जणांचे लसीकरण; विक्रमी नोंदhttps://t.co/J7wPztIS0x
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. वाढती रुग्णसंख्या आणि राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकल्यात आल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएस (MBBS) आणि एमडीच्या (MD) इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावं यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.
भारत, हिम्मत बनाए रखो #StayStrongIndia #स्टेस्ट्रॉगइंडिया #surajyadigital #india #strong #staystrong #सुराज्यडिजिटल
अबू धाबीने कोविडच्या कठीण काळात तिरंगा फडकावून भारताला पाठिंबा दर्शविलाय…. pic.twitter.com/94UJl8PRKE— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
तसंच दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. CBSC बोर्डाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, तर दहावीची परीक्षा रद्द केली आहे. 12वीच्या परीक्षा कधी घ्यायच्या यासंदर्भातील निर्णय 1 जून नंतर घेण्यात येणार आहे.
विरोधी पक्षनेत्यांचा लसीकरणावरुन सरकारवर पुन्हा हल्ला #लसीकरण #DevendraFadnavis #political #maharashtra #surajyadigita #सुराज्यडिजिटल
– लसीकरणाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही – देवेंद्र फडणवीसhttps://t.co/Ho1VFvanFK— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
* सात राज्यांनी परीक्षा ढकलल्या पुढे
देशातील बहुतेक बोर्डांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. केवळ CBSC, ICSE नाही तर देशभरातील एकूण सात राज्यातील शिक्षण मंडळांनी आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.