सोलापूर : गेल्या 24 तासात सोलापूरात 1878 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील 24 हजार 745 पैकी 20 हजार 584 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ग्रामीण भागातील 70 हजार 925 पैकी 57 हजार 825 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोलापुरातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने लोकांना दिलासा मिळत आहे.
राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन #RajivSatavhttps://t.co/A48Ys9T4vi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. सोलापुरात आज एकूण 1, 878 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 38 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात 1, 306 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये बुधवारी 814 तर शहरात 492 असे 1306 रुग्ण बरे झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोदींचा मोठा निर्णय; ऑक्सिजनची चिंता मिटणार, ५०० पीएसए प्लँटमुळे ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ होणार
https://t.co/gXZZni3Tcy— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
सोलापूरच्या ग्रामीण भागात बुधवारी 7840 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामधून 1, 646 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज बुधवारी 814 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर उपचार घेत असताना 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही 11,512 रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
#ayushmankhurana सीएम कोव्हिड 19 रिलीफ फंडमध्ये अभिनेता आयुषमानची मदत https://t.co/bOwyulcilj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने 2291जणांची टेस्ट केली. त्यामध्ये 232 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापुरात नव्याने दाखल होत असल्यापैकी बरे होण्याऱ्याची संख्या अधिक आहे. सोलापूर शहरात उपचार घेत असलेल्या 492 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, शहरात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुच आहे. पॉझिटिव्ह असलेल्या आणि उपचार घेत असलेल्या 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात आजही विविध रुग्णालयात 3,081 रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यातील पहिल्या महिला आयएफएस अधिकारी बार्शीच्या स्नुषा, सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची भारतीय वनसेवेत पदोन्नती https://t.co/XpyIA7P6wp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021