मुंबई : राज्यात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात सध्या जे निर्बंध लादले आहेत ते पुरेसे आहेत. यापेक्षा अधिक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही असे मला वाटते, असे महत्त्वाचे विधान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार सीएम केअर फंडला एका महिन्याचं देणार वेतन, बाळासाहेब थोरातांची मोठी मदतhttps://t.co/lbI35tW2ut
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधला. 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी केंद्राने राज्यावर दिलेली आहे. ही जबाबदारी पेलायला राज्य सरकार तयार असल्याचे सांगितले. उद्यापासून 18-44 वयोगटाचं लसीकरण पुरवठ्यानुसार सुरू करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना संदर्भात जनतेशी साधलेला संवाद #मुख्यमंत्री #संवाद #ठाकरे #surajyadigital #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #सुराज्यडिजिटल #coronavirushttps://t.co/gi50j6Ekmb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
राज्यात 15 दिवस संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करा, असे मुंबई हायकोर्टाने गुरुवारी राज्य सरकारला सांगितले आहे. त्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. हायकोर्टाने कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार करायला सांगितले आहे. त्यावर तुम्हाला आणखी कडक निर्बंध हवे आहेत का, अशी विचारणा मी जनतेला करत आहे. मला वाटते जनतेचे उत्तर नको असे असेल. मलाही तसेच वाटत आहे. तुम्ही जो संयम आणि समजूतदारपणा दाखवत आहात ते पाहता यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मला वाटत आहे. त्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का?' https://t.co/aqT2yzocOe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
संपूर्ण देश आज करोनाच्या खदखदत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात आपण निर्बंध घातले नसते व संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची स्थितीसुद्धा आज भीषण झाली असती. सुदैवाने गेले काही दिवस आपल्या राज्यातील करोनाचे आकडे स्थिर झाले आहेत. ते आकडे कमी करण्यासाठी, करोना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला यापुढेही संयम दाखवायचा आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांचाही तपशील दिला. फिल्ड हॉस्पिटलची संख्या आपण वाढवली आहे. आता राज्यात साडेपाच हजार कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. ऑक्सिजन सुविधा, बेड्स याबाबत आपण सातत्याने काम करत आहोत. आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास #surajyadigital #वेळ #विश्वास #सुराज्यडिजिटल #time #lockdown #लॉकडाऊन #मुख्यमंत्री #ठाकरे pic.twitter.com/jXjGufWUbv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
* महाराष्ट्रात कोरोनाचे 62,919 नवे रुग्ण; 828 जणांचा मृत्यू
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या जास्त नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात (30 एप्रिल) कोरोनाचे 62,919 नवे रुग्ण आढळले. राज्यभरात 69,710 रुग्ण कोरोनातून बरे झालेत तर 828 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,62,640 इतकी आहे.