मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज 61 वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हुतात्मा चौक इथे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आलं. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही अभिवादन केले. तर महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आलं.
महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/i9MtT6ET35
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2021
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
गुजरात : भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 18 रुग्णांचा मृत्यू https://t.co/FlFNXeu9Bh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलिस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा ६१ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तसेच राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/oSaIQ4pQQa
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2021
* अजित पवारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा ? उद्या निकाल, भालके किंवा आवताडे #Bhalke #विजय #Byelection #पंढरपूर #गुलाल #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/ywZx01rQYW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘महाराष्ट्र दिन’ व ‘जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा! महाराष्ट्राची स्थापना संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील शहीद वीरांना भावपूर्ण आदरांजली! महाराष्ट्रवासियांची एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आहे’, असं त्यांनी ट्विट केलं.
पाच राज्यांत कोण मारणार बाजी ? उद्या निकाल #results #five #State #surajyadigital #राज्य #निकाल #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gmTbpuCCrw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021