नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांवर उपचारांसाठी अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या घटना समोर येत आहेत. राजधानी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेमध्ये ऑक्सिजनअभावी ८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये देखील पडताना दिसत आहेत.
रशियाची 'स्पुटनिक V' – सर्वात प्रभावी कोरोना लस भारतात दाखल https://t.co/5iGNwk9FMS
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
आज याच सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारले आहे. ‘आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे’, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याअभावी ८ रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहेे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन https://t.co/IrVidbQuuB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठा देखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात रोज सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहे.
गुजरात : भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 18 रुग्णांचा मृत्यू https://t.co/FlFNXeu9Bh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
ऑक्सिजन पुरवठ्यावरुन दिल्ली उच्च न्यायालयाने आता आमच्या डोक्यावरुन पाणी चाललंय, असं म्हणत केंद्र सरकारला चांगलंच खडसावलंय. “आमच्या डोक्यावरुन पाणी केलंय. आता आम्हाला कृती हवी आहे. तुम्हाला सर्व गोष्टींची व्यवस्था करावी लागेल. तुम्ही तरतूद केलीय, तर तुम्हाला ती पूर्ण करावी लागेल,” असं मत न्यायालयाने व्यक्त केलं. तसेच न्यायालयाच्या आदेशांचं पालन न झाल्यास न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई करण्याचाही इशारा सरकारला दिलाय. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्लीच्या वाट्याचा ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन काहीही करुन आजच्या आज पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
पाच राज्यांत कोण मारणार बाजी ? उद्या निकाल #results #five #State #surajyadigital #राज्य #निकाल #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gmTbpuCCrw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021