सोलापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले.
राज्यात आणखी कडक लॉकडाऊनची वेळ आली नाही, 18-44 वयोगटाचं लसीकरण पुरवठ्यानुसार सुरू करणारhttps://t.co/ouCQQKVRsE
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
सकाळी आठ वाजता झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक आनंद काजूळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
गुजरात : भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 18 रुग्णांचा मृत्यू https://t.co/FlFNXeu9Bh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष शेलार, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर आदी अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेले नियम पाळून कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.
महाराष्ट्र- कामगार दिनाच्या शुभेच्छा, कोरोना काळात स्वतःची, परिवाराची घ्या काळजी, प्रगतीसाठी आपण महत्त्वाचे आहात #maharashtra #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #महाराष्ट्र #प्रगती #development #surajyadigital #IMPORTANT #कामगारदिन #labourday #Labour #कामगार #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WwTfa9FoUi
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021