सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 35 व्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे सध्या 101607 मतांसह आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके 97,212 मतांसह पिछाडीवर आहेत. त्यामुळे आवताडे याचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे पंढरपूरचा आतापर्यंतचा निकाल हा तीन पक्षांनी मिळून बनलेल्या ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का आहे, अशी टीका होत आहे.
समाधान आवताडेंच्या घरासमोर भाजपा समर्थकांचा निकालाआधीच विजयी जल्लोष, परिचारक यांनी पंढरपुरात चांगली मोट बांधली https://t.co/FaMSecl2J2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात प्रतिष्ठेची लढाई सुरू असताना सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे आघाडीवर होते. परंतु, त्यानंतर समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली. त्यामुळे पंढरपुरात कमी मताधिक्य मिळाल्याने भारत भालके यांना नागरिकांनी जो प्रतिसाद दिला तो त्यांच्या सुपुत्राला नागरिकांनी दिला नसल्याचं स्पष्ट होत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
पंढरपूर विधानसभा – राष्ट्रवादीला धक्का, भाजप पुढे; 4100 मतांची आघाडी, पंढरपूर शहर व तालुक्यातील मतमोजणी संपली; मंगळवेढ्यातील मतमोजणीला सुरुवात
https://t.co/GMHEo4yr9K— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
समाधान आवताडे यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे, देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात, त्यांच्या डोक्यात असणार आहे,पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस शून्य, अस्तित्वहिन झालीय,यापुढच्या निवडणुकीतही आम्ही संघटनात्मक काम करणार असल्याचे म्हटले आहे. सरकारच्या कामावर जनता नाराज असल्यानं पंढरपुरात भाजपचा विजय झाल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.
शिवसेनेच्या आवाहनानंतरही भाजपचीच बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत मुसंडी #surajyadigital #Byelection #belgaum #भाजपा #शिवसेना #Shivsena #मुसंडी #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/ODyBi8ABBy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी केला.
पंढरपुरात भाजपचा विजय हा जनतेने ठाकरे सरकारविरोधात दिलेला कौल, समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया यांनी दिली आहे.
भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी https://t.co/usjxJaOLi5
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* राजू शेट्टींनी मतदारसंघ पिंजून काढला; उमेदवाराला डिपॉझिट वाचवणे अवघड
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी तळ ठोकला होता. या मतदारसंघात फिरुन त्यांनी लोकांकडे मते आणि निधीही मागितला होता. मात्र, राजू शेट्टींच्या उमेदवाराला पंढरपूरकरांनी नाकारले आहे. स्वाभिमानीच्या सचिन शिंदे यांना 17 व्या फेरीअखेर केवळ 320 मते मिळाली आहेत.
आपले डिपॉझिट वाचेल, एवढेही मते त्यांना घेता आली नाहीत. सातव्या फेरीनंतर भाजपाच्या समाधान आवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे. तर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पंढरपूर-मंगळवेढाकरांनी सपशेल नाकारले आहे.
गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? आज मतदान, मंगळवारी निकाल https://t.co/UNWkC8nCro
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* अभिजीत बिचुकलेंचे डिपॉझिट जप्त होणार
‘बिग बॉस’ या रिॲलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते. बिचुकलेंनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात अचानक उडी घेतल्यामुळे येथील रंगत वाढली. तर, ही निवडणूक मीच जिंकणार, असा विश्वासही बिचुकले यांनी व्यक्त केला होता.
मात्र, या निवडणुकीत त्यांना आपलं डिपॉझिटही वाचवता येत नसल्याचे दिसून येत आहे. बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बिचुकलेंनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात अचानक उडी घेतल्यामुळे येथील रंगत वाढली. तर, ही निवडणूक मीच जिंकणार, असा विश्वासही बिचुकले यांनी व्यक्त केला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना आपलं डिपॉझिटही वाचवता येत नसल्याचं दिसून येत आहे.