सोलापूर / पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी शेवटपर्यंत आघाडी घेतली आहे. अद्याप काही फेऱ्या बाकी आहेत, पण भाजपा समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे.
राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपाचे समाधान आवताडे यांना 2295 मतांची आघाडी #surajyadigital #पोटनिवडणूक #सुराज्यडिजिटल #Byelection #pandharpur #पंढरपूर #भाजपा #NCP pic.twitter.com/UizMugk1N7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
सहाव्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून निकालाआधीच विजयी जल्लोष करण्यात आला. भाजपाच्या समाधान आवताडे यांना 31 व्या फेरीअखेर 91437 तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना 85479 मते मिळाली.
तृणमूलला स्पष्ट बहुमत, मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8 हजाराने पिछाडीवर https://t.co/vXWmv2DxAv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी 19 व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरुवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं.
महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पितृशोक, सोलापुरात अंत्यसंस्कार
https://t.co/Xf7JW2mCWF— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 36 फेऱ्या पार पडल्या. तर, सुरुवातीला पोस्टल मतमोजणी घेण्यात आली. त्यामध्ये भगिरथ भालकेंना आघाडी मिळाली होती. तेथून पहिल्या 5 फेऱ्या होईपर्यंत भालकेंनी आघाडी कायम ठेवली. मात्र, त्यानंतर, आवताडेंनी आघाडी घेत शेवटपर्यंत मतांचा आलेख वाढतच नेला. अखेरच्या टप्प्यात ते भूमिपुत्र असलेल्या मंगळवेढा मतदारसंघातूनही त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं. त्यामुळे, त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असं समजून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केलाय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्यातील 35 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.
या मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख 40 हजार 889 एवढी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील यांसह अन्य मंत्र्यांनी वारंवार सभा घेतल्या. तर समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढला.
पंढरपूर विधानसभा – राष्ट्रवादीला धक्का, भाजप पुढे; 4100 मतांची आघाडी, पंढरपूर शहर व तालुक्यातील मतमोजणी संपली; मंगळवेढ्यातील मतमोजणीला सुरुवात
https://t.co/GMHEo4yr9K— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये मतदारांनी स्व. भारत भालके यांची आमदारकीची गादी भगीरथ भालके यांच्याकडेच सोपवली की मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी मतदार समाधान आवताडे यांच्या बाजूने उभे राहिले, याचा फैसला आज मतमोजणीतून होत आहे.
भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी https://t.co/usjxJaOLi5
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* परिचारक यांनी पंढरपुरात चांगली मोट बांधली
पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या उमदेवाराला 10-10 हजारांचं मताधिक्य मिळेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसला होता. पण, यंदा प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात चांगली मोट बांधली आहे. येथील मतदारसंघातून दोनवेळा परिचारक यांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे, जवळ राहून अंतर्गत विरोध करणाऱ्यांना यंदा प्रशांत परिचारक यांनी बाजूला सारले. तसेच, या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना जवळ घेऊन मतदारसंघात भाजपाचा प्रचार केला.
त्यामुळे, राष्ट्रवादीला अपेक्षित मतं येथून मिळाली नाहीत. अठराव्या फेरीअखेरची आकडेवाडी सांगताना, आता मंगळवेढा शहर आणि ग्रामीणची मतमोजणी होणार आहे. सध्या समाधान आवताडे आघाडीवर आहेत, तर आता मंगळवेढा हा त्यांचाच मतदारसंघ आहे, ते तेथील भूमिपुत्र आहेत. त्यामुळे, मंगळवेढ्यात आघाडी घेऊन ते निश्चितच विजयी होतील, असे पडळकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.